WTC Points Table : बांगलादेशने चारली पाकिस्तानला धूळ; WTC टेबलमध्ये खळबळ, भारतालाही मोठा झटका

Mumbai : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या म्हणजेच WTC च्या पॉइंट टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तुलनेनं दुबळ्या मानल्या जाणाऱ्या बांगलादेश (Bangladesh national cricket team) ने कसोटी मालिकेत पाकिस्तान (Pakistan national cricket team) संघाला पराभूत करत मोठा धक्का दिला. या निकालाचा परिणाम भारतावरही झाला असून भारतीय संघ WTC क्रमवारीत एका स्थानाने खाली घसरला आहे.


दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशने पाकिस्तानवर २-० असा विजय मिळवला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) अंतर्गत खेळल्या गेलेल्या या मालिकेनंतर WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. या बदलानुसार भारतीय संघ आता पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरला आहे, तर पाकिस्तान सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर गेला आह. यात बांगलादेशने सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.




बांगलादेशने दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा ७८ धावांनी पराभव केला. याआधी मीरपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीतही बांगलादेशने पाकिस्तानला १०४ धावांनी हरवले होते. या दोन विजयांमुळे बांगलादेशला WTC गुणतालिकेत मोठा फायदा झाला. सध्या बांगलादेशने चार कसोटी सामन्यांपैकी दोन विजय, एक पराभव आणि एक अनिर्णित असा निकाल नोंदवत ५८.३३ टक्के गुण मिळवले आहेत. तर भारताने नऊ कसोटी सामन्यांत चार विजय, चार पराभव आणि एक अनिर्णित सामना असा निकाल नोंदवत ४८.१५ टक्के गुण मिळवले आहेत. WTC मध्ये भारतीय संघ आता आशियाई संघांच्या शर्यतीत पाकिस्तानच्या पुढे असला तरी गुणतालिकेत मात्र घसरला आहे. शुभमन गीलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने यावर्षी अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

भारत ६ जूनपासून अफगानिस्तान विरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे, मात्र हा सामना WTC चा भाग नसणार आहे. त्यानंतर भारतीय संघ वर्षाच्या शेवटी श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे, जिथे प्रत्येकी दोन कसोटी सामने खेळले जातील. त्यानंतर २०२७ मध्ये मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका होणार आहे. दरम्यान, भारताला मायदेशात साउध अफरिकाकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला होता. तसेच इंग्लंड दौऱ्यावरही दोन सामने गमवावे लागले. मात्र गिलच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची मालिकेत २-२ अशी बरोबरी केली होती.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील

अजिंक्य रहाणेची नवी इनिंग सुरू होणार

मुंबई : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता खेळाडू म्हणून नव्हे, तर समालोचकाच्या नव्या भूमिकेत

Cristiano Ronaldo Marriage : अखेर रोनाल्डोने जॉर्जिनासोबत थाटला संसार! 10 वर्षांच्या प्रेमकहाणीला लग्नाची सुंदर किनार

फुटबॉलविश्वातील दिग्गज स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. रोनाल्डोने

IND vs AFG: भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक जाहीर; दिल्लीत रंगणार सामना

भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात लवकरच एका रोमांचक टी-20 मालिकेचे आयोजन केले जाणार आहे. या मालिकेची चाहते