Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी एका व्यक्तीची तब्बल ६६ लाख ५४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे. या घटनेमुळे गुंतवणुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर टोळ्यांचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. (Online Fraud)


सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अलिबाग तालुक्यातील शिवनगर, चेंढरे परिसरातील रहिवासी आहेत. १३ फेब्रुवारी २०२६ ते ११ मे २०२६ या कालावधीत अज्ञात आरोपींनी फेसबुकच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठा नफा मिळतो, असे सांगत विविध लिंक आणि बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची माहिती दिली. (Online Fraud)



यानंतर आरोपींनी बनावट ग्राफ, खोटे नफ्याचे स्क्रीनशॉट आणि डेमो दाखवत फिर्यादीचा विश्वास जिंकला. सुरुवातीला कमी रकमेची गुंतवणूक करून मोठा परतावा मिळाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे फिर्यादीला अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. (Online Fraud)


सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. “शेअर्स खरेदी”, “प्रीमियम मेंबरशिप”, “विशेष ट्रेडिंग योजना” आणि “मोठ्या नफ्यासाठी अतिरिक्त गुंतवणूक” अशा विविध कारणांखाली आरोपींनी टप्प्याटप्प्याने तब्बल ६६ लाख ५४ हजार ३६३ रुपये उकळले.


काही दिवसांनी गुंतवलेली रक्कम आणि नफा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर फिर्यादीला संशय आला. आरोपींकडून सतत नवीन पैसे भरण्याची मागणी होत असल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. (Online Fraud)



या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ०२/२०२६ अन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(डी) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल जाधव करत आहेत.


दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरून येणाऱ्या गुंतवणुकीच्या ऑफर्सपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, अनधिकृत ट्रेडिंग अ‍ॅप्सवर विश्वास ठेवू नये आणि जास्त परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून दूर राहावे, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. (Online Fraud)

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी