संपूर्ण कोकणाला जलवाहतुकीने जोडणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या ३ वर्षांत मुंबई-महानगरात २७ जेट्टी कार्यान्वित करणार


मुंबई : "मुंबई महानगर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीचा प्रवास अधिक वेगवान, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर करण्यासाठी राज्य सरकारने जलवाहतुकीचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने तब्बल २७ आधुनिक जेट्टी कार्यान्वित करण्यात येणार असून, आगामी काळात ही जलवाहतूक सेवा संपूर्ण कोकण किनारपट्टीला जोडेल," अशी माहिती घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.

मुंबईत आयोजित एका वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. लॉजिस्टिक आणि प्रवासी वाहतुकीसाठी रस्ते किंवा रेल्वेपेक्षा जलमार्ग हा सर्वात स्वस्त आणि वेगवान पर्याय असल्याने सरकार या क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, "अनेक वर्षांपासून मुंबईत जलवाहतूक आणि 'रो-रो' सेवेबाबत केवळ चर्चाच सुरू होत्या. माझ्या मागील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आम्ही प्रत्यक्ष पावले उचलत भाऊचा धक्का ते मांडवा (अलिबाग) अशी रो-रो सेवा सुरू केली, जी आज प्रचंड यशस्वी ठरली आहे. याच धर्तीवर आता आम्ही संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात एकात्मिक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचे काम हाती घेतले आहे."

मुंबई आणि उपनगरांना सागरी मार्गाने जोडण्यासाठी वेगवेगळ्या २७ ठिकाणी अत्याधुनिक जेट्टी आणि पायाभूत सुविधांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील ३ वर्षांत ही कामे विविध टप्प्यांत पूर्ण केली जातील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांचा ताण आणि प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होईल. मुंबईच्या या जलवाहतूक नेटवर्कचा विस्तार करून पुढे संपूर्ण कोकण किनारपट्टी जलमार्गाने मुंबईशी थेट जोडली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

'लॉजिस्टिक' खर्च कमी होणार

जलमार्गाच्या आर्थिक फायद्यांवर प्रकाश टाकताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "देशाच्या किंवा राज्याच्या आर्थिक विकासात लॉजिस्टिक कॉस्ट (वाहतूक खर्च) अत्यंत महत्त्वाची असते. रस्त्यांच्या तुलनेत जलमार्गाने होणारी वाहतूक ही अत्यंत स्वस्त असते. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतुकीसाठीही हा जलमार्ग क्रांती घडवून आणेल." या शाश्वत पर्यायामुळे मुंबई ते कोकण प्रवासाचा वेळ कमालीचा वाचणार असून स्थानिक पर्यटनालाही यामुळे मोठी उभारी मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
Comments
Add Comment

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता