नॉन क्रिमीलेअर मर्यादा १५ लाख करण्याची ओबीसी उपसमितीची शिफारस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार; ४३ नव्या जातींच्या समावेशासाठी केंद्राकडे जाणार


मुंबई : नॉन क्रिमीलेअरची मर्यादा आठहून १५ लाखांपर्यंत करण्याच्या ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊ असे निर्देश उपसमितीचे अध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.


या शिफारशीसह केंद्र शासनाच्या इतर मागास प्रवर्गाच्या यादीत समाविष्ट नसलेल्या ४३ जातीचा प्रस्ताव राष्ट्रीय मागासवर्ग आयोगास सादर करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती बैठक पार पडली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वनमंत्री गणेश नाईक, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, इतर मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


बैठकीत विविध तांत्रिक व धोरणात्मक विषयांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जात पडताळणी समितीकडील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करणे, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती आणि विविध महामंडळांच्या नियुक्त्यांचा प्रश्न अग्रक्रमाने सोडविणे, राज्य मागासवर्ग आयोगाचे बळकटीकरण, उपसंचालक, सहाय्यक संचालक यांना वाहन घेण्यास मंजूरी, सध्या शिबिरांचे आयोजन करुन त्या माध्यमातून जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू असून, जिल्हाधिकाऱ्याशी बैठक घेऊन योग्य आणि पात्र व्यक्तींनाच प्रमाणपत्र दिले जावे अशी शिफारस करणे तसेच चुकीच्या लोकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येऊ नये असे आदेश देण्यात यावेत. अशा सूचनाही यावेळी करण्याची शिफारस करण्यात आली. वसतिगृह आणि कार्यालयांसाठी १० जिल्ह्यांमध्ये जागा उपलब्ध करण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल असे, बावनकुळे यांनी सांगितले.बैठकीसाठी विशेष उपस्थित लक्ष्मण हाके यांनी प्रशासकीय त्रुटींकडे लक्ष वेधले. "स्पेलिंग मिस्टेकमुळे राज्यातील २७ ते ३२ जाती शासकीय लाभांपासून वंचित आहेत, यावर केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवून तातडीने दुरुस्ती करावी," अशी मागणी केली.

Comments
Add Comment

Antara Banerjee : अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये आरपीएफ जवानांवर केला रेझरने हल्ला

मुंबई : मॉडेल आणि वेब सिरीज अभिनेत्री अंतरा बॅनर्जी (३१) हिला १२ ऑगस्ट रोजी अरवली एक्सप्रेसमध्ये जागेचे आरक्षण

Ashwin Mushran : अभिनेता अश्विन मुश्रानच्या कारचा अपघात, स्थानिकांशी वाद घालतानाचा Viral Video

मडगाव : 'लगे रहो मुन्ना भाई', 'शहजादा', 'फॅशन', 'मैं तेरा हीरो' आणि 'देसी बॉईज' अशा निवडक हिंदी चित्रपटांतून चमकलेला

Auto Rickshaw : ऑटो-टॅक्सी चालकांना मराठीचे ज्ञान अनिवार्य; नियम न पाळल्यास तीन टप्प्यांत कारवाई

मुंबई : राज्यातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 18 ऑगस्टपासून कामापुरते मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता