Mahayuti : महायुतीला डाग लागेल अशी वक्तव्य नको, समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय

तिन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांना सूचना देणार


मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तिन्ही मित्रपक्षांचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्तम समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. महायुतीची प्रतिमा मलीन होईल, युतीला डाग लागेल किंवा विरोधकांना टीका करण्याची संधी मिळेल, अशाप्रकारचे कोणतेही वादग्रस्त भाष्य कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अथवा कार्यकर्त्यांनी करू नये, असे मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले.



शालेय शिक्षण मंत्री मंत्री दादा भुसे यांच्या 'जंजिरा' शासकीय निवासस्थानी महायुतीच्या समन्वय समितीची ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, अतिशय खेळीमेळीच्या आणि सलोख्याच्या वातावरणात ही बैठक पार पडली. तिन्ही मित्रपक्षांचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असला पाहिजे, याबाबत चर्चा झाली. महायुतीला डाग लागेल किंवा टीका होईल, अशाप्रकारचे भाष्य कोणत्याही पक्षाचे नेते वा कार्यकर्त्यांनी करायचे नाही, असे ठरवण्यात आले.



या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या जागावाटपावर या बैठकीत मुख्यत्वे खलबते झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या एकूण १६ जागांसाठीच्या संभाव्य फॉर्म्युल्यावर या बैठकीत प्रामुख्याने मंथन करण्यात आले. जागावाटपावरून तिन्ही पक्षांत कोणताही कटुता येऊ नये, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षनिहाय संख्याबळाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.



रखडलेल्या महामंडळ वाटपाचा तिढा सुटणार?


विधान परिषदेसोबतच गेल्या अनेक महिन्यांपासून महायुतीतील घटक पक्षांमध्ये रखडलेल्या शासकीय महामंडळांच्या वाटपाचा तिढा सोडवण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. कोणती महामंडळे नेमकी कुणाच्या वाट्याला येणार आणि कार्यकर्त्यांना सत्तेत कसे वाटेकरी करून घ्यायचे, याविषयीचे फॉर्म्युला ठरवण्यासाठी नेत्यांनी सविस्तर चर्चा केली.

Comments
Add Comment

Ganpati Special Trains : चाकरमान्यांचे हाल! ऐन गणपती उत्सवात कोकण-उत्तर महाराष्ट्रातील 3 महत्त्वाच्या गाड्या रद्द

मुंबई : मध्य रेल्वेने मार्गक्षमता, वेळापत्रक आणि परिचालनाचा ताळमेळ साधत दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया या विशेष

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा

Pune Weather : पुण्यात रविवारी पावसाच्या सरींची शक्यता; घाटमाथ्यावर यलो अलर्ट

पुणे : रविवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

Sunday Mega Block : रविवारचा मेगाब्लॉक; मध्य रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर वाहतुकीत बदल; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीनंतर रविवारी, 16 ऑगस्ट रोजी मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर मेगाब्लॉकचा परिणाम

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला