हिंदू समुदायावर अन्याय करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल - कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा

मालवणी मधल्या अनधिकृत बांधकामाने पीडित महिलेची मंत्री लोढा यांनी घेतली भेट


बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी देशाच्या सुरक्षेला धोका, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे कडक कारवाई संदर्भात लोढा यांनी केली चर्चा *


मुंबई : मालवणी येथील स्थानिक नगरसेवक आणि आमदाराच्या आशीर्वादानेच अनधिकृत बांधकामाला खतपाणी मिळत असून स्थनिकांवर दबावतंत्राचा वापर करून बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय दिला जात असल्याचे कॅबिनेट मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. भू माफियांचा आणि अनधिकृत बांधकाम करणारे हिंदू समुदायावर अन्याय करत असून आता हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, तर त्यांना सडेतोड उत्तर देणार असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. बांगलादेशी आणि रोहिंग्यांची अनधिकृत बांधकामं देशाच्या सुरक्षेला धोका असून त्या विरोधात संघर्ष सुरूच राहील असेही लोढा यांनी सांगितले. मालवणी परिसरातील सावरिया मशीद येथे रागिणी रमाशंकर चौरसिया या महिलेचा घरचा दरवाजा बंद करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्या पीडित महिलेची भेट घेतल्या नंतर मंत्री लोढा पत्रकारांशी बोलत होते.
मालवणी अब्बासिया कंपाऊंड येथे राहणारी रागिणी रामशंकर चौरसिया या महिलेच्या घराला लागूनच शौकत हुसेन आबिद हुसेन सैय्यद यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीतर चौरसिया कुटुंबीयांना त्यांनी घरचा दरवाजा बंद करण्यास भाग पाडले. स्थानिक हिंदू संघटनांनी या बाबत आवाज उठवला होता. मात्र अबिद आणि हुसेन यांनी त्याकडे दुर्लक्ष करत ही बांधकाम अधिकृत असल्याचे सांगितले. मात्र प्रकरण पोलिसात गेल्यानंतर ते बांधकाम अधिकृतच असल्याचे निष्पन्न झाले. कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी हा विषय गांभीर्याने घेतला असून त्यांनी त्या पीडित महिलेची भेट घेतली तसेच मालवणी पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्याकडे कडक कारवाईची मागणी केली.
आदरणीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांनी देशभरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून सर्वांना सुरक्षित वातावरण निर्माण केले आहे. तर राज्यात माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनात गृह विभाग अतिशय प्रभावीपणे कार्यरत आहे. या राज्यात हिंदू समुदायावरील अत्याचार सहन केला जाणार नाही, तर आरोपींवर कडक कारवाई होईल की, कुणाचेही हिंदू समुदायावर अन्याय करण्याचे धाडस होणार नाही, असा इशाराच असा इशाराच यावेळी मंत्री लोढा यांनी दिला.



स्थानिक आमदार असलम शेख यांचे नगरसेवक पुत्र इस्लाम शेख यांनीच अब्बासिया कंपाऊंड येथे रस्त्यावर अवैध छबील (पाणपोई) बांधकामाचे उद्घाटन केले होते. कोणतीही परवानगी नसताना ६ फूट बाय १२ फूट लांबी-रुंदीचे सिमेंट-विटांचे बांधकाम तब्बल १४ फूट उंचीपर्यंत वाढवण्यात आले आहे. यासाठी ६ लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत. यावर आता महापालिकेची कारवाई होत असून अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर ही फौजदारी कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे
Comments
Add Comment

Nashik : चार महिन्यांपूर्वीचा काँक्रिटीकरण झालेला रस्ता पुन्हा फोडला, नाशिक महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Nashik : नाशिक शहरातील सीबीएस ते कॅनडा कॉर्नरदरम्यान (CBS to Canada Corner) अवघ्या चार महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेला

Nashik Crime : आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार, प्रकरण दाबण्यासाठी आजीची हत्या ? जिल्ह्यात खळबळ

Nashik Crime News : सिन्नर तालुक्यातुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील वावी परिसरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Jawharla Earthquake : पालघर जिल्हा हादरला! जव्हारला भूकंपाचे सलग धक्के! ४ वेळा हादरली जमीन

- नागरिकांनी भीतीच्या सावटाखाली जागून काढली रात्र पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार परिसराला सोमवारी रात्री

Maharashtra Weather Update : मान्सूनचा ब्रेक संपणार! १३ ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा धुमाकूळ

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी मान्सून पुन्हा जोर

BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी - भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत

Gargai Water Project : गारगाई पाणी प्रकल्पासाठी मेक्सिकोतील कंपनीची सल्लागार म्हणून निवड

- मेक्सिकोतील धरणांचे आणि मुंबईत मेट्रोचे काम पाहणाऱ्या संस्थेवर जबाबदारमुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई