मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने अफगाणिस्तान विरुद्धच्या एका कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी तसेच तीन वन डे च्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. कसोटीसाठीच्या संघात तीन नवोदीत खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. शुभमन गिलकडे कसोटी आणि वन डे साठीच्या संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. केएल राहुल कसोटीसाठी उपकर्णधार असेल.
आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एक कसोटी सामना (टेस्ट मॅच) आणि तीन एकदिवसीय सामने (वन डे) होणार आहेत. कसोटी सामना ६ जूनपासून तर वन डे मालिका १४ जून पासून सुरू होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या निवड समितीने अफगाणिस्तान विरूद्धच्या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि बीसीसीायचे सचिव देवजित सैकिया यांनी भारतीय संघाची घोषणा केली. कसोटी संघात तीन खेळाडूंना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. मानव सुथार, गुरनूर ब्रार आणि हर्ष दुबे यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आला असून हे तिघेही भारतीय संघासाठी पदार्पण करू शकतात.
View this post on Instagram
अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीसाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, रिषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)
अफगाणिस्तानविरुद्ध वनडेसाठी भारतीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अर्शदीप सिंग, इशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर, हर्ष दुबे.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
एकमेव कसोटी सामना, पीसीए नवे क्रिकेट स्टेडियम, तिरा - ६ ते १० जून २०२६ - सकाळी ९.३० वा.
View this post on Instagram
तीन वन डे मॅच
१४ जून २०२६ - पहिली वन डे - हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला - दुपारी १.३० वा. १७ जून २०२६ - दुसरी वन डे - एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ - दुपारी १.३० वा. २० जून २०२६ - तिसरी वन डे - एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई - दुपारी १.३० वा.






