गेटवे परिसरातील डिझेल बोटी होणार इलेक्ट्रिक; हरित आणि इंधन बचतीसाठी राज्य सरकारचा पुढाकार

इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेने विशेष कर्ज योजना आणावी - मंत्री नितेश राणे


इलेक्ट्रिक बोटिंसाठी मुंबई बँक विशेष पॉलिसी तयार करणार; मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर


पहिल्या टप्प्यात ५ जणांना प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून देणार


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि हरित पर्यावरणासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरातील डिझेलवर चालणाऱ्या बोटींचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करून यासाठी बोट धारकांना मुंबई बँकेमार्फत आर्थिक सहाय्य आणि विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देण्याबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश यांची मुंबई बँक अध्यक्ष तथा विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासमवेत बैठक पार पडली."सध्या गेटवे परिसरात ९७ लायसन्सधारक लाकडी बोटी कार्यरत असून या बोटी डिझेलवर चालत असल्याने बोट मालकांना दरमहा सुमारे १ लाख रुपयांपर्यंत इंधन खर्च करावा लागतो. पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणे तसेच बोट मालकांचा खर्च कमी करणे या उद्देशाने प्रवासी व मच्छिमारी बोटींचे इलेक्ट्रिक बोटींमध्ये रूपांतर करण्यासाठी विशेष योजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे" मंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले.


इलेक्ट्रिक बोटींची किंमत अंदाजे २.५ कोटी ते ६ कोटी रुपयांपर्यंत असल्याने मत्स्य संस्था, खासगी बोट मालक, वैयक्तिक लाभार्थी आणि असोसिएशन यांच्यासाठी कमी व्याजदरातील विशेष कर्ज योजना उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई बँकेने स्वतंत्र धोरण तयार करावे," असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. तसेच व्यक्तींना सहकारी संस्थांचे सभासद करून घेणे किंवा स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास शासनाच्या विविध योजना आणि अनुदानांचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी नमूद केले.


या उपक्रमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात २५ लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यापैकी पहिल्या ५ जणांना प्रायोगिक तत्त्वावर इलेक्ट्रिक बोटी उपलब्ध करून द्याव्यात, तसेच मुंबई बँकेने इलेक्ट्रिक बोटिंसाठी विशेष पॉलिसी तयार करून ती आगामी संचालक मंडळ बैठकीत मंजुरीसाठी सादर करावी, असे निर्देश मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.मुंबईचा मूळ निवासी असलेल्या कोळी बांधवाला आधुनिक करताना हरित पर्यावरण, इंधन बचत आणि आधुनिक जलपर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम मुंबईसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा; गारपिटीचीही शक्यता

मुंबई : राज्यात सध्या काही भागांत पावसाची हजेरी सुरू असली, तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप दमदार पावसाची

Free School Bag : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्य सरकारकडून १७४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या

Western Railway Food and Water Safety : पश्चिम रेल्वेची अन्न आणि पाणी सुरक्षेसाठी कडक तपासणी; 98 टक्के अन्न नमुने, तर 99.87 टक्के पाणी नमुने सुरक्षित

मुंबई : प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने

Mumbai Port Global Partnership : मुंबईच्या सागरी विकासाला वेग; क्रूझ पर्यटनापासून जहाजबांधणीपर्यंत जागतिक गुंतवणुकीच्या संधी

मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणाने (MbPA) व्यापार, पर्यटन आणि बंदराधारित विकासाला नवी दिशा देत क्रूझ पर्यटन, मरिना

BMC : लालबागमधील मानाचे गणपती परिसरातील पदपथांवरील अतिक्रमण हटवली; तब्बल ६ अनधिकृत दुकानांसह ४३ फेरीवाल्यांवर कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ विभागाकडून कारवाई Mumbai : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी सुलभ

Ritu Tawde : तुमची दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही; महापौरांनी विरोधकांना भरला दम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका सभागृहात विरोधकांकडून अपशब्द वापरत गैरवर्तन केल्यानंतर महापौरांचा