Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी घेतला वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याचा आढावा

मुंबई : पालघर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून विकसित होत असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याचा राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी गुरुवारी सखोल आढावा घेतला. महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे, बंदरांची क्षमता वाढवणे आणि राज्याला जागतिक सागरी व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.





मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी जवाहरलाल नेहरू(Jawaharlal Nehru) पत्तन प्राधिकरणाच्या (JNPA) उरण येथील मुख्य प्रशासकीय भवनाला भेट देऊन बंदराच्या विविध विकासकामांचा तसेच भविष्यातील विस्तार आराखड्याचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जेएनपीएची विद्यमान बंदर क्षमता, आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास, पर्यावरणपूरक व्यवस्थापन आणि मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी या विषयांवर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. यासोबतच, जेएनपीएमार्फत आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने चालवल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांबाबतही बैठकीत सविस्तर मंथन झाले.



वाढवण बंदर प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या सागरी वाहतुकीला आणि लॉजिस्टिक नेटवर्कला मोठी गती मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि मल्टीमोडल लॉजिस्टिक नेटवर्क अधिक सक्षम करण्याबाबत विविध उपाययोजनांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. या बैठकीला जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाळ, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, जेएनपीएच्या सचिव तथा महाव्यवस्थापक मनीषा जाधव यांच्यासह जेएनपीए आणि महाराष्ट्र सागरी मंडळातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले