Vidhanparishad Elections : विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी १८ जूनला मतदान

२२ जूनला मतमोजणी; स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर


मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी (१८ मे) या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार १६ जागांसाठी गुरुवार, १८ जून २०२६ रोजी मतदान होणार असून, २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे संबंधित मतदारसंघांच्या कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.


निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची निवडणूक घेण्यासाठी संबंधित क्षेत्रातील किमान ७५ टक्के स्थानिक संस्था कार्यरत असणे आणि ७५ टक्के मतदार (लोकप्रतिनिधी) पदावर असणे अनिवार्य असते. यापूर्वी अनेक महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या मुदती संपल्यामुळे आणि तिथे प्रशासक राजवट असल्याने हा ७५ टक्क्यांचा निकष पूर्ण होत नव्हता. परिणामी, २०२२, २०२४ आणि २०२५ मध्ये मुदत संपलेल्या या १६ जागांवर निवडणुका घेता आल्या नव्हत्या. आता या सर्व मतदारसंघांमध्ये आवश्यक निकष पूर्ण झाले असल्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.



या जागा रिक्त


१. ठाणे : रवींद्र फाटक (निवृत्ती: ०८.०६.२०२२)
२. पुणे : अनिल शिवाजीराव भोसले (निवृत्ती: ०५.१२.२०२२)
३. नागपूर : दुष्यंत सतीश चतुर्वेदी (यवतमाळ जागा - निवृत्ती: ०५.१२.२०२२)
४. नाशिक : नरेंद्र भिकाजी दराडे (निवृत्ती: २१.०६.२०२४)
५. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत सुनील तटकरे (निवृत्ती: ३१.०५.२०२४)
६. छत्रपती संभाजी नगर -जालना : अंबादास दानवे (निवृत्ती: २९.०८.२०२५)
७. अहिल्यानागर : अरुणकाका जगताप (निवृत्ती: ०१.०१.२०२२)
८. सोलापूर : प्रशांत परिचारक (निवृत्ती: ०१.०१.२०२२)
९. जळगाव : चंदूभाई व्ही. पटेल (निवृत्ती: ०५.१२.२०२२)
१०. सांगली-सातारा : मोहनराव कदम (निवृत्ती: ०५.१२.२०२२)
११. नांदेड : अमरनाथ राजूरकर (निवृत्ती: ०५.१२.२०२२)
१२. भंडारा-गोंदिया : डॉ. परिणय रमेश फुके (निवृत्ती: ०५.१२.२०२२)
१३. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (निवृत्ती: २१.०६.२०२४)
१४. अमरावती : प्रवीण पोटे (निवृत्ती: २१.०६.२०२४)
१५. धाराशिव-लातूर-बीड : सुरेश रामचंद्र धस (निवृत्ती: २१.०६.२०२४)
१६. परभणी-हिंगोली : विप्लव बजोरिया (निवृत्ती: २१.०६.२०२४)


निवडणूक कार्यक्रम असा...


- अधिकृत अधिसूचना :२५ मे २०२६
- उमेदवारी अर्ज) अंतिम मुदत : १ जून २०२६
- उमेदवारी अर्जांची छाननी : २ जून २०२६
- अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ४ जून २०२६
- मतदान : १८ जून २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत)
- मतमोजणी आणि निकाल : २२ जून २०२६


मतदार कोण?


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या जागांवर महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील निर्वाचित लोकप्रतिनिधी मतदान करतात. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी) आणि महाविकास आघाडी (काँग्रेस, उबाठा गट, शरद पवार गट) यांच्यात या १६ जागांवर थेट आणि प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळेल. अनेक ठिकाणी संख्याबळ राखण्यासाठी आणि मतांची जुळवाजुळव करण्यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्सला वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि