Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत केलेल्या आवाहनानंतर देशभरातील विविध शासकीय विभागांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना मिळत आहे. अनेक मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि सरकारी संस्थांनी वाहनांचा ताफा कमी करून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनीही इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.


महापालिका आयुक्तांच्या वाहन सेवेत सध्या स्कोडा ही गाडी असून त्यांच्यासाठी नवीन इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करण्याचा विचार आहे. खुद्द आयुक्तांनी हे वाहन वापरण्याची इच्छा प्रकट केल्यानंतर शुक्रवारी महिंद्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनाची ट्रायल घेण्यात आली. रात्री आठ वाजता महापालिका मुख्यालय ते आयुक्तांचे निवासस्थान अशी या वाहनाची ट्रायल घेण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ट्रायल घेतलेली गाडी पसंद पडली कि आणखी अन्य गाडीची ट्रायल घेतली जाईल याबाबत काहीच स्पष्टता नसली तरी सोमवारनंतर इलेक्ट्रिक वाहन आयुक्तांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती मिळत आहे.


महापालिका आयुक्त स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणार असल्याने प्रशासनातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही यापासून प्रेरणा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारी पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढल्यास इंधनावरील खर्चात मोठी बचत होण्यासोबतच प्रदूषण नियंत्रणालाही मदत होणार आहे. विशेषतः मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशा उपाययोजना महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.


मुंबई महापालिकेच्या ताफ्यात सध्या २२० वाहने असून त्यातील पेट्रोल व इलेक्ट्रीक संयुक्त आधारीत ०६ वाहने तर निव्वळ इलेक्ट्रीक ३६ वाहनांचा समावेश आहे. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक वाहन या संयुक्त सुविधा असलेल्या सहा वाहनांचा वापर महापौर आणि अतिरिक्त आयुक्त पदावरील अधिकारी करत आहेत.


तर या ३६ इलेक्ट्रीक वाहनांचा वापर सध्या खातेप्रमुख व विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून केले जात आहे. ही इलेक्ट्रिक वाहने एका चार्जिंगमध्ये सरासरी २८० किलोमीटर सेवा देतात. तर भाडेतत्वावरील एकूण ३५० वाहनांची सेवा घेतली जात असून त्यातील ७० वाहने ही निव्वळ इलेक्ट्रीक वाहने आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजात मुंबईच्या महापौर यांनीही इलेक्ट्रिक वाहन वापरण्याची इच्छा प्रकट केली आहे तसे आपण आठवड्यातील काही दिवस ट्रेन मधून प्रवास करणार असल्याचे जाहीर केले याशिवाय काही सनदी अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलत पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत इलेक्ट्रिक वाहन वापरण्याची इच्छा प्रकट केली आहे. त्यामुळे भविष्यात महापालिकेच्या ताफ्यातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली जाण्याची शक्यता वर्तवली जाते.मुंबई महापालिकेच्या सर्वोच्च प्रशासकीय पदावरील अधिकाऱ्यांनी घेतलेला हा निर्णय प्रशासनाच्या हरित आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)