Hind Kesari : फायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळचा हात जखमी; महेंद्र गायकवाड ठरला ५२ वा 'हिंद केसरी'!

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडिअमवर पार पडलेल्या ५२ व्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात मानाच्या हिंद केसरी गदेकरिता रंगलेली लढत अखेर दुखापतीमुळे थांबली. सामन्यादरम्यान पृथ्वीराज मोहोळच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याला अखेर माघार घ्यावी लागली. प्रतिस्पर्ध्याने माघार घेतल्यानंतर पंचांनी महेंद्र गायकवाडला ५२ व्या हिंद केसरीचा विजेता घोषित केले. विजेतेपदासोबतच महेंद्र गायकवाडला मानाची चांदीची गदा, महिंद्रा थार आणि रोख रकमेचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. तर उपविजेता ठरलेल्या पृथ्वीराज मोहोळला ट्रॅक्टर प्रदान करण्यात आला.



महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील अंतिम सामना सुरुवातीपासूनच अत्यंत चुरशीचा झाला होता. दोन्ही पैलवानांनी डाव-प्रतिडावांची आतषबाजी करत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. मात्र सामन्याच्या सुरुवातीलाच महेंद्र गायकवाडने पृथ्वीराज मोहोळचा हात जोरदार पिरगळला. या डावामुळे पृथ्वीराजच्या हाताला दुखापत झाली आणि त्यानंतर सामना काही काळासाठी थांबवण्यात आला. पंचांनी मेडिकल टाइम दिल्यानंतर डॉक्टरांनी मैदानात येत पृथ्वीराजच्या दुखापतीची तपासणी केली.


काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर पृथ्वीराज मोहोळ पुन्हा आखाड्यात उतरला. जखमी हात असूनही त्याने सामना सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र हाताची वेदना वाढत असल्याने त्याला पूर्ण ताकदीने खेळता येत नव्हते. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पृथ्वीराज मोहोळने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पंचांनी महेंद्र गायकवाडला विजेता घोषित केले आणि स्टेडिअममध्ये जल्लोष उसळला.



दरम्यान, उपांत्य फेरीत महेंद्र गायकवाडने दिल्लीच्या अनिरुद्धला ९-७ अशा फरकाने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या सामन्याची सुरुवातही अत्यंत दमदार झाली होती. महेंद्रने दुसऱ्याच मिनिटाला दुहेरी पटचा अचूक डाव टाकत दोन गुण मिळवले. त्यानंतर अनिरुद्धनेही जोरदार पुनरागमन करत दुहेरी पट लावत गुणांची बरोबरी साधली. ब्रेकनंतर महेंद्र गायकवाडने पुन्हा आक्रमक खेळ करत आणखी दोन गुण पटकावले. मात्र अनिरुद्धनेही हार न मानता प्रत्युत्तर दिले आणि सामना ४-४ अशा बरोबरीत आणला.


शेवटच्या मिनिटापर्यंत सामना अत्यंत रंगतदार स्थितीत होता. दोन्ही पैलवान एकमेकांवर सतत हल्ले करत होते. निर्णायक क्षणी महेंद्र गायकवाडने दुहेरी पटाचा अचूक डाव टाकत तब्बल चार गुणांची कमाई केली आणि सामन्यावर पकड मजबूत केली. त्यानंतर त्याने आणखी एक गुण मिळवत ९ गुणांपर्यंत मजल मारली. पराभव जवळ आलेला असतानाही अनिरुद्धने संघर्ष सुरूच ठेवला. त्याने शेवटच्या काही सेकंदांत तीन गुण मिळवत सामना ९-७ पर्यंत आणला. मात्र अखेरीस महेंद्र गायकवाडने दोन गुणांच्या फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली होती.


दुसऱ्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या पृथ्वीराज मोहोळने एनसीआरच्या रजतवर मात करत अंतिम फेरी गाठली होती. सामन्याच्या अवघ्या पहिल्या २० सेकंदांत पृथ्वीराजने जबरदस्त डाव टाकत दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर त्याने डबल लेग अटॅक करत आणखी दोन गुण मिळवले. पहिल्याच मिनिटात ४ गुणांची आघाडी घेत पृथ्वीराजने प्रतिस्पर्ध्यावर दबाव निर्माण केला होता. त्याच्या आक्रमक खेळामुळे रजतला सावरायलाही वेळ मिळाला नाही आणि पृथ्वीराजने दमदार कामगिरी करत फायनलमध्ये प्रवेश केला होता.

Comments
Add Comment

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग

India U19 Squad : ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारताचा १९ वर्षांखालील संघ जाहीर; सेहवाग-द्रविडच्या मुलांना संधी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघाची घोषणा

Dean Elgar Retirement : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गरने घेतली व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी सलामीवीर डीन एल्गरने (Dean Elgar Retirement) व्यावसायिक

IND vs SL 2nd Test Day 5 : भारताला हव्यात ४ विकेट्स, पण पावसामुळे विजय हुकणार? कोलंबोत हवामानाचा मोठा धोका

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना निर्णायक

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या