Union Minister Son Arrested : केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गंभीर आरोप; दारू पाजून शोषण केल्याचा दावा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार (Bandi Sanjay Kumar) यांचे पुत्र बंडी भगीरथ (Bandi Bhagirath) यांना शनिवारी (१६ मे) तेलंगणा पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी त्यांच्याविरोधात ‘पॉक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तेलंगणा उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या घटनेमुळे तेलंगणाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


अटकेपूर्वी केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले की, “माझा मुलगा बंडी भगीरथ याला आमच्या वकिलांमार्फत तपासासाठी तेलंगणा पोलिसांसमोर हजर करण्यात आले आहे.” तक्रार दाखल झाल्यानंतर लगेचच मुलाला पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश दिल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, तेलंगणा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळत भगीरथला अधिकृतपणे अटक करण्यात आल्याचे स्पष्ट केले.



बंडी संजय कुमार यांनी पुढे सांगितले की, त्यांचा मुलगा सुरुवातीपासून स्वतः निर्दोष असल्याचा दावा करत आहे. त्याच्याकडे या प्रकरणात महत्त्वाचे पुरावे असून ते वकिलांसमोर सादर करण्यात आले आहेत. वकिलांच्या मते हा खटला न्यायालयात टिकणार नाही आणि त्याला जामीन मिळण्याची शक्यता असल्यानेच शरण येण्यास उशीर झाला. मात्र, प्रकरण अधिक लांबवणे योग्य नसल्याचे लक्षात घेऊन त्यांनी स्वतःहून मुलाला तपासासाठी पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे त्यांनी नमूद केले. सोमवारी न्यायालयाचा आदेश येण्याची शक्यता असली तरी न्यायव्यवस्थेचा आदर राखण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



या प्रकरणाची सुरुवात ८ मे रोजी झाली. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर भगीरथविरुद्ध ‘लुकआऊट सर्कुलर’ जारी करण्यात आले. एफआयआरनुसार, भगीरथचे संबंधित अल्पवयीन मुलीसोबत संबंध होते. मुलीने त्याच्यावर लैंगिक शोषण, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे तसेच जबरदस्तीने दारू पाजल्याचा गंभीर आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘पॉक्सो’ कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.


दरम्यान, आरोपी बंडी भगीरथ यानेही पोलिसांकडे प्रति-तक्रार दाखल केली आहे. त्यात त्याने असा दावा केला की, संबंधित मुलगी त्याला तिच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये आणि विविध पार्ट्यांमध्ये स्वतः बोलवत होती. तसेच, मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि तब्बल ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही त्याने तक्रारीत केला आहे.


या संपूर्ण प्रकरणानंतर तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने आणि आंदोलनं झाली. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. के. कविता (K. Kavitha) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून या प्रकरणात निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच, चौकशी निष्पक्ष होण्यासाठी केंद्रीय मंत्री बंडी संजय कुमार यांना तत्काळ मंत्रीपदावरून हटवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिक-नांदुरी रस्त्याच्या रुंदीकरण कामाची पाहणी, गुणवत्ता निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

Nashik : सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिक–नांदुरी रस्त्याच्या (Nashik-Nanduri road) सुरू असलेल्या

Monsoon Health Tips : पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? ‘हे’ सोपे उपाय करा; आरोग्य राहील एकदम फिट!

मुंबई : पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण त्याचबरोबर सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार, त्वचेचे संसर्ग

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,