RCB VS PBKS : सलग पाच पराभवाने पंजाबसमोर डू ऑर डाय स्थिती ! धर्मशाळेत पंजाब-आरसीबी आमने सामने

IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये आज १७ मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अशी निर्णायक लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेश असोसिएशनच्या धरमशाला स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना या हंगामातला ६१ वा सामना आहे .आता फक्त ९ साखळी सामने उरलेले आहेत . त्यामुळे टॉप पाच संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. हा सामना दुपारी ३:३० वाजता खेळला जाणार आहे. विशेष, म्हणजे या मैदानावर पंजाबला गेल्या १५ वर्षापसून आरसीबीला हरवण्यात यश आले नाही आहे.


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने हंगामाची सुरुवात चांगली केली होती. पण सलग पाच पराभव झाल्यामुळे त्यांच्यासाठी प्लेऑफचे आव्हान कठीण झाले आहे. पंजाबला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आता उर्वरित दोन्ही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. यापैकी एक सामना आज आहे. तर आरसीबी प्लेऑफसाठी पात्र झाली आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने १२ पैकी ८ सामने जिंकत १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबने १२ पैकी ६ सामने जिंकत १३ गुण मिळवले आहेत. त्यांना एक सामना पावसात वाहून गेल्यामुळे गुणांच्या बाबतीत थोडा फायदा झाला आहे. पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना आरसीबी आणि लएसजी या दोन्ही संघांना हरवणे आवश्यक आहे.आरसीबीसाठी विराट कोहलीने या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १२ सामन्यात ४८४ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने १२ सामन्यात २२ विकेट्स घेतल्या आहेत. प्रभसिमरनने या हंगामात पंजाबसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १२ सामन्यात ४३९ धावा केल्या आहेत. अर्शदीप सिंहने १२ सामन्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत.



निकालाचा परिणाम चेन्नईवर होणार ?


चेन्नई सुपरकिंग्स सध्या या हंगामात सहाव्या स्थानावर आहे. संघाने १२ पैकी सहा सामने जिंकले आहेत. चेन्नईचे सध्या १२ गुण आहेत. सर्व सामने जिंकले तरी चेन्नईला १६ गुण पर्यंत मजल मारता येईल . मात्र पंजाब आज जिंकली तर चेन्नईचे प्लेऑफ आव्हान संपुष्टात येईल. पंजाबचे आता १३ गुण आहेत व त्यांचा नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगला आहे. त्यामुळे आज पंजाबचा विजय चेन्नईसाठी तोट्याचा ठरू शकतो.


हेड टू हेड


आयपीएल इतिहासात पंजाब आणि आरसीबीमध्ये आता पर्यंत ३७ सामने झाले आहेत. यात आरसीबीने १९ तर पंजाबने १८ सामने जिंकले आहेत.



कशी असेल खेळपट्टी ?


पंजाब आणि आरसीबीचा सामना धरमशाला स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत धरमशालाच्या खेळपट्टीवर दोन सामने झाले आहेत. हे सामने प्रथम गोलंदाजी करणाऱ्यांनी जिंकले आहेत. यामुळे नाणेफेकीचा कौल सामन्याच्या निकालावर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.

प्लेइंग-XI


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली, जॅकब बेथेल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, वेंकटेश अय्यर, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि जॅकब डफी।


इम्पॅक्ट प्लेयर: रसिक सलाम।


पंजाब किंग्स: प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अझमतुल्ला ओमरझाई, विजयकुमार वैशाख, मार्को यानसन, अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहल।


इम्पॅक्ट प्लेयर: विष्णू विनोद।

Comments
Add Comment

Football fever in Kolhapur : क्रिकेटच्या देशात फुटबॉलचा थरार; अर्जेंटिनाच्या विजयाने कोल्हापूर झाले 'फुटबॉलमय'!

Kolhapur : भारत हा तसा क्रिकेटवेडा देश, पण कोल्हापूरची गोष्टच न्यारी आहे! 'सॉकर सिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या

FIFA WORLDCUP 2026 : अर्जेंटिनाच्या टीकाकारांना मेस्सीचे चोख उत्तर: 'आम्हाला काहीही आयते मिळालेले नाही'

लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाच्या विश्वचषक प्रवासावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. "आम्हाला काहीही फुकट

Major Cricket League : एका सामन्यात ३ शतकं, ५१ सिक्स अन् ५३७ रन; क्रिकेटच्या इतिहासात लिहिला गेला नवा अध्याय

मुंबई : टी-२० क्रिकेटच्या इतिहासात असा सामना पाहायला मिळाला, ज्याने या फॉरमॅटमधील (Format) जवळपास सगळे मोठे विक्रम (Records)

ICC : वर्ल्ड कपमध्ये आयसीसीचा ‘मास्टर प्लॅन’? भारत-पाक सामन्यांसाठी मोठा बदल

मुंबई : क्रिकेट विश्वातील सर्वात चर्चेचा विषय ठरलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

Rohit Sharma Retirement News : रोहित शर्माच्या निवृत्तीची चर्चा; इंग्लंडविरुद्धचा सामना ठरणार शेवटचा?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज (Batsman) रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या वनडे (ODI)

IND vs ENG : कार्डिफमध्ये इंग्लंडची बाजी; भारताला पराभूत करत मालिकेत साधली बरोबरी

कार्डिफ : जो रूट (Joe Root) याच्या नाबाद ९९ धावांच्या (Runs) शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताचा दुसऱ्या एकदिवसीय (ODI)