MS DHONI : आयपीएलमध्ये मोठा ट्विस्ट, धोनी या तारखेला खेळणार अखेरचा सामना, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

IPL 2026 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवाने केली होती. लीग स्टेजमधील सीएसकेचे आता फक्त दोन सामने बाकी आहेत. जर सीएसके प्लेऑफला पोहोचली तर त्यांना आणखी सामने खेळण्याची संधी मिळू शकते. या टप्प्यावर चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. एम.एस धोनी पुन्हा मैदानात उतरणार आहे.


धोनीला पोटरीच्या दुखापती आयपीएलच्या आतापर्यंतच्या एकाही सामन्यात खेळता आले नाही, त्यामुळे चाहते नाराजी व्यक्त करत होते. पण काही रिपोर्टनुसार, धोनी दोन सामन्यांच्याआधीच फिट झाला होता. मात्र संघ व्यवस्थापनाने त्याला संधी देणे टाळले. विशिष्ट कॉम्बिनेशनचे कारण प्रत्येकवेळी पुढे केले गेले. अखेर आता धोनीच्या पुनरागमनाची चर्चा रंगली आहे. धोनी १८ मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.



एम. एस धोनीचा अखेरचा सामना ?


एम. एस धोनी हा गेल्या १६ वर्षांपासुन चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळत आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तो आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. या हंगामात त्याने अजून एकही सामना खेळला नाही आहे. ४४ वर्षीय धोनी काफ इंज्युरीमुळे दीर्घ काळ विश्रंती घेत होता. पण आता तो फिट असल्याचं सांगितले जात आहे. काही रिपोर्टनुसार धोनीचा हा आयपीएलमध्ये अखेरचा सामना असू शकतो. त्यामुळे चाहत्यांसाठी हा भावनिक क्षण ठरू शकतो. धोनीने यापूर्वी एका इंटरव्ह्युमध्ये आपली इच्छा व्यक्त केली होती, तो म्हणाला होता की माझा शेवटचा आयपीएल सामना चेन्नईत व्हावा. ही इच्छा प्रत्यक्षात येण्याची शक्यता वाढली आहे.

Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील