कोलकाता : आयपीएल २०२६ स्पर्धेतील ६० व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. या सामन्यात गुजरात टायटन्सला २९ धावांनी पराभूत केले. नाणेफेकीचा कौल हा गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कोलकात्याने या संधीचा फायदा घेतला आणि २० षटकात २ गडी गमवून २४७ धावा केल्या. तसेच विजयासाठी २४८ धावांचे आव्हान दिले. हे आव्हान काही गुजरात टायटन्सला गाठता आले नाही. त्यामुळे प्लेऑफचे गणित या सामन्यातही सुटले नाही. खरे तर हा सामना गुजरात टायटन्सने जिंकला असता तर प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला असता. पण तसे झाले नाही. त्यामुळे प्लेऑफचे गणित लांबले आणि आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. खरे तर केकेआरचे स्पर्धेतील आव्हान अजूनही कायम ठेवले आहे. केकेआरचे या विजयासह ११ गुण झाले आहेत. तर उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तर १५ गुण होतील. त्यामुळे एखादा चमत्कार घडला तर कोलकाता प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकते.
अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याशी ...
केकेआरने विजयासाठी दिलेल्या २४८ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने आश्वासक सुरूवात केली. साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी १८ चेंडूत ४२ धावांची भागीदारी केली. पण दुखापतीमुळे साई सुदर्शन रिटायर्ड हर्ट झाला. त्यामुळे धावांचा वेग मंदावला. निशांत सिंधु फलंदाजीला आला, पण १ धाव करून बाद झाला. त्यानंतर शुभमन गिलने जोस बटलरसोबत डाव सांभाळला.
मुंबई : देशाचा परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मौल्यवान धातूंच्या वाढत्या आयातीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. ...
आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून अजिंक्य रहाणे आणि फिन एलन ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. अजिंक्य रहाणे १४ चेंडूत १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर फिन एलन आणि अंगकृष रघुवंशी यांचे वादळ घोंघावले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४१ चेंडूत ९५ धावांची भागीदारी केली. फिन एलनने ३५ चेंडूत ४ चौकार आणि १० षटकार मारून ९३ धावा केल्या आणि बाद झाला. त्याचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले. फिन एलन बाद झाल्यानंतरही अंगकृष रघुवंशी आणि कॅमरून ग्रीन यांनी फटकेबाजी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ५२ चेंडूत नाबाद १०८ धावांची खेळी केली. अंगकृष रघुवंशीने ४४ चेंडूत नाबाद ८२ धावा, तर कॅमरून ग्रीनने २८ चेंडूत नाबाद ५२ धावा केल्या. गुजरात आणि कोलकाता यांच्यात झालेल्या या सामन्यामध्ये पॉवर प्लेमध्ये विशेष बाब घडली. दोन्ही संघांनी ५६ धावा केल्या.
कोलकाताचा षटकारांचा विक्रम
कोलकाता नाईट रायडर्सकडून अजिंक्य रहाणे, फिन ऍलेन, अंगक्रिश रघुवंशी आणि कॅमेरॉन ग्रीन या फलंदाजांनी मिळून २२ षटकार या डावात मारले. त्यामुळे आयपीएल २०२६ मध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आता कोलकाताच्या नावावर नोंदवला गेला आहे. गेल्या या हंगामातील ५९ सामन्यात कोणत्याही संघाला २२ षटकार मारता आलेले नाहीत. तसेच एकूण आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या संघांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील सनरायझर्स हैदराबादची बरोबरी केली आहे. त्यांनी २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये २२ षटकार मारले होते. पहिल्या क्रमांकावर पंजाब किंग्स असून २०२४ मध्ये त्यांनी कोलकाताविरुद्ध २४ षटकार मारले होते.






