Sunil Narine : जीटीविरुद्ध सुनील नरेन ऐतिहासिक रेकॉर्डच्या उंबरठ्यावर ; २०० सामने खेळणारा पहिला विदेशी!

IPL 2026 : आयपीएलमध्ये आज एक मोठा इतिहास घडणार आहे. आयपीएलमध्ये आज १६ मे रोजी कोतकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्सची लढत होणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात कोलकाताकडून सुनील नरेन नवा इतिहास रचणार आहे. हा सामना त्याच्या आयपीएल करियरमधील २०० वा सामना ठरणार आहे. तो २०० सामना खेळणारा पहिला परदेशी खेळाडू बनणार आहे. त्याने २०१२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तसेच त्याने मागील १५ वर्षांत कोलकातासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने आतापर्यंत १९९ सामन्यांमध्ये ६.७९ च्या इकॉनॉमी रेटने २०३ विकेट्स घेतल्या आहेत. इतक्या मोठ्या करियरमध्येही त्याचा इकॉनॉमी रेट कधीच सातच्या पुढे गेला नाही.


200 सामने खेळणारा पहिला विदेशी


सुनील नरेनपूर्वी आयपीएलमध्ये २०० सामने खेळण्याचा पराक्रम १२ भारतीय खेळाडूंनी केला आहे. मात्र विदेशी खेळाडूंमध्ये हा विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरणार आहे.



आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू


आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नावावर आहे. दोघांनीही आतापर्यंत २७९ सामने खेळले आहेत. यापूर्वी हा विक्रम चेन्नईच्या धोनीच्या नावावर होता,. धोनीने २७८ सामने खेळले आहेत. मात्र या हंगामात त्याने अद्याप एकही सामना खेळलेला नाही.


आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू:


२७९ – विराट कोहली


२७९ – रोहित शर्मा


२७८ – एमएस धोनी


२६५ – रवींद्र जडेजा


२५७ – दिनेश कार्तिक


२२२ – शिखर धवन


२२१ – रविचंद्रन अश्विन


२०९ – अजिंक्य रहाणे


२०५ – सुरेश रैना


२०५ – रॉबिन उथप्पा


२०४ – अंबाती रायुडू


२०२ – भुवनेश्वर कुमार


१९९ – सुनील नरेन

Comments
Add Comment

IND vs SLA Test Series Sai Sudharsan : साई सुदर्शन सराव सामन्याला मुकणार, पण...; पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा

India vs Sri Lanka Test Series : भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शन (Sai Sudharsan) याच्या दुखापतीमुळे चाहत्यांची

Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्माच्या निवडीवरून BCCI विरुद्ध निवड समिती? आगरकर कोंडीत; पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे?

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वरिष्ठ खेळाडूंच्या निवडीवरून चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्माच्या (Rohit

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : 'अजिंक्य रहाणेला कधीच योग्य श्रेय मिळालं नाही'; रहाणेच्या निवृत्तीनंतर सुनील गावसकर भावुक, राहुल द्रविडशी केली तुलना

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य

Neeraj Chopra : नीरज चोप्रा या महिन्यात लॉझेन डायमंड लीगमध्ये उतरणार

लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन