Belgium national football team : बेल्जियमचा वर्ल्ड कप संघ जाहीर, केविन डी. ब्रुयनला कर्णधारपद, ओपेंडा संघातून बाहेर

आगामी फिफा वर्ल्डकप २०२६ साठी (FIFA WORLD CUP 2026) बेल्जियम फुटबॉल फेडरेशनने २६ खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. यावेळी मिडफिल्डर केविन डी. ब्रुयन संघाचे नेतृत्व करताना दिसेल तर गोलकीपर थिबो कोर्टुओ व्हाईस कॅप्टन पदाची जबाबदारी हाताळेल. वर्ल्ड कप २०२६ ची सुरुवात १२ जूनपासून होणार आहे. यंदाचा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये खेळला जाणार आहे. बेल्जियम वर्ल्ड कपच्या ग्रुप-जी मध्ये आहे. या ग्रुपमध्ये इजिप्त, इराण आणि न्यूझीलंड संघाचा स़मावेश आहे. बेल्जियम ग्रुपमधील सर्व सामने जिंकेल असे अनेकांचे मत आहे. संघाचा पहिला सामना १६ जूनला इजिप्तविरुद्ध होणार आहे.



नागरिकता स्पॅनिश पण वर्ल्ड कप बेल्जियमसाठी खेळणार


लिलेचा २१ वर्षीय खेळाडू मटियास फॉर्नांडीज-पार्डो याला बेल्जियम संघात संधी देण्यात आली आहे. हा संघात फॉरवर्ड म्हणून खेळणार आहे. नुकतीच मटियासने स्पॅनिश नागरिकता मिळवली आहे. मात्र स्पॅनिश संघासाठी न खेळता तो बेल्जियमसाठी वर्ल्ड कप पदार्पण करणार आहे. थॉमस म्यूनिएर आणि नाथन न्गोय यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे तो बेल्जियम संघासाठी खेळत आहे असं बोललं जात आहे. प्रशिक्षक रूडी गार्सिया यांनीही या युवा खेळाडूवर विश्वास दाखवला आहे.



ओपेडा संघातून बाहेर


गेल्या काही हंगामापासून खराब फॉर्ममध्ये असणाऱ्या युव्हेंटसचा स्ट्रायकर लोइस ओपेंडाला यावेळी वर्ल्ड कप संघात संधी मिळाली नाही. इंग्लिश क्लब लीड्स युनायटेडने त्याला खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. खराब फॉर्ममुळे त्याला २६ खेळाडूंच्या यादीत स्थान मिळाले नाही. तसेच, गोलकीपर मॅट सेल्सलाही यावेळी संघात संधी मिळाली नाही.बेल्जियम संघाने आतापर्यंत १३ वेळा वर्ल्ड कप मध्ये भाग घेतला आहे. २०१८ साली बेल्जियमने वर्ल्ड कपमध्ये तिसरे स्थान मिळवले होते. ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.





वर्ल्ड कप २०२६ साठी बेल्जियमचा संघ खालीलप्रमाणे आहे


गोलकीपर: थिबो कोर्टुआ, सेने लैमेंस, माइक पेंडर्स.


डिफेंडर: टिमोथी कास्टैग्ने, जेनो डेबास्ट, मॅक्सिम डी क्यूपर, कोनी डी विंटर, ब्रँडन मेचेले, थॉमस म्यूनिएर, नाथन न्गोय, जोकिन सीस, आर्थर थिएट.


मिडफील्डर: केविन डि ब्रुइन, अमादू ओनाना, निकोलस रास्किन, युरी टिलेमैंस, हंस वानाकेन, एक्सेल विटसेल.


फॉरवर्ड: चार्ल्स डी केटलेरे, जेरेमी डोकू, मटियास फर्नांडीज-पार्डो, रोमेलु लुकाकू, डोडी लुकेबाकियो, डिएगो मोरेरा, अलेक्सिस सेलेमेकर्स, लिएंड्रो ट्रॉसार्ड


Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)