धुळे : धुळ्यातील एका कुटुंबात बहिणीच्या लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच काही तासांतच अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली. लग्नाचा सोहळा आनंदात पार पडून घरी परतलेल्या आई-वडिलांची त्यांच्या स्वतःच्या मुलाने निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. विशेष म्हणजे, पत्नीसमोर आई-वडिलांनी अपमानास्पद शब्द वापरल्याचा राग मनात धरून मुलाने संतापाच्या भरात थेट जन्मदात्या आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला केला. या दुहेरी हत्याकांडामुळे धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कल्याण: कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा टवाळखोरांची दहशत समोर आली आहे. गार्डनमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या तरुण-तरुणीवर ४ ते ५ जणांच्या टोळक्याने ...
धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील महावीर सोसायटीमध्ये गुरुवारी (१५ मे २०२६) दुपारच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. इंदाराम महतो आणि त्यांची पत्नी रांजुदेवी महतो यांनी नुकतेच आपल्या मुलीचे लग्न मोठ्या आनंदात पार पाडले होते. लग्नाचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण अजूनही घरात कायम असतानाच अचानक घरगुती कारणावरून त्यांचा मुलगा चंदन इंदाराम महतो याच्यासोबत वाद झाला.
वाद वाढत असताना आई-वडिलांनी पत्नीसमोर आपला अपमान केल्याची भावना चंदनच्या मनात निर्माण झाली. पत्नीसमोर अपमानास्पद शब्द ऐकावे लागल्याने तो संतापाने अनावर झाला. रागाच्या भरात त्याने घरात असलेले मुसळ उचलले आणि आई-वडिलांच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. हा हल्ला इतका भीषण होता की, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने इंदाराम महतो आणि रांजुदेवी महतो यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू झाला.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अतिउष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि झाडांवर ताण वाढतो. परिणामी, झाडांची मुळे कमकुवत होऊन जमिनीवरील पकड सैल पडण्याची ...
घटनेनंतर आरोपी चंदन महतो हा घरातून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, तो घाईघाईने घराबाहेर पडताना शेजाऱ्यांना संशय आला. नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याला जागीच पकडून ठेवले आणि तातडीने शिरपूर पोलिसांना माहिती दिली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आरोपीला फरार होण्यात यश आले नाही.






