Gig Workers Strike : इंधन दरवाढीविरोधात देशव्यापी संप; स्विगी, ओला-उबर, झेप्टोसह अनेक ॲप-आधारित सेवा आज ठप्प!

मुंबई : देशभरातील गिग वर्कर्सनी आज, १६ मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली असून त्याचा परिणाम अनेक लोकप्रिय ॲप-आधारित सेवांवर होणार आहे. स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, झेप्टो, ओला, उबर, रॅपिडोसह अ‍ॅमेझॉन डिलिव्हरी सेवांमध्ये काम करणारे लाखो कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. वाढत्या इंधन दरांमुळे आर्थिक ताण वाढल्याचा दावा करत गिग-प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियनने हा संप पुकारला आहे.



LPG, CNG, दूध तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गिग वर्कर्समध्ये नाराजी आहे. विशेषतः पेट्रोल-डिझेलच्या दरात नुकतीच प्रति लिटर तीन रुपयांची वाढ झाल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. याच पार्श्वभूमीवर तब्बल १.२ कोटी गिग वर्कर्सनी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे.


युनियनच्या माहितीनुसार, आज १६ मे रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अनेक ॲप-आधारित सेवा तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या काळात फूड डिलिव्हरी, ग्रोसरी डिलिव्हरी तसेच कॅब सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना ऑर्डर डिलिव्हरी आणि प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


गिग-प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियनचे म्हणणे आहे की, वाढत्या महागाईमुळे आणि इंधन दरवाढीमुळे गिग वर्कर्सच्या रोजच्या कमाईवर मोठा परिणाम होत आहे. बहुतांश डिलिव्हरी बॉय आणि कॅब चालक हे बाइक किंवा स्कूटरवर अवलंबून असल्याने इंधन खर्चात वाढ झाल्यास त्यांचा नफा कमी होत आहे.


युनियनने सरकार आणि संबंधित कंपन्यांकडे प्रति किलोमीटर सेवा दर वाढवण्याची मागणी केली आहे. इंधन दरवाढीनंतर किमान २० रुपये प्रति किलोमीटर सेवा दर निश्चित करण्यात यावा, अशी त्यांची मागणी आहे. तसेच गिग वर्कर्सच्या मानधनासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

Comments
Add Comment

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका