बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती कार्यक्रम तयार करावा तसेच बारव परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.


राज्य शासनाने स्थापन केलेल्या बारव संवर्धन समितीची बैठक आज मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्यासह बारव बचाव मोहीमेचे प्रतिनिधी रोहन काळे, अभ्यासक डॉ. पराग सदगीर, डॉ. चंद्रकांत रागिट, सुभाष शिंदे, श्रीनिवास वडगबळाकर, सुभाष शिंदे, श्रीकांत उमरीकर, प्रमोद कुलकर्णी, सौरभ जामकर, अरविंद कडबे, अँड. धायगुडे, भागवत मसणे आदीं या बैठकीला उपस्थितीत होते.बैठकीत बारव संवर्धनाच्या कामात येणाऱ्या अडचणी, आवश्यक उपाययोजना तसेच शासन आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समिती सदस्यांनी विविध सूचना मांडल्या.



यावेळी मंत्री ॲड.शेलार यांनी बारव संवर्धनासाठी कार्यपद्धती निश्चित करणारे परिपत्रक जारी करण्याच्या सूचना दिल्या. समिती सदस्यांचा सहभाग, जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय, जिल्हा नियोजन निधीतून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये पुरातत्व संवर्धनाचे निकष पाळणे, समितीच्या नियमित बैठकींचे वेळापत्रक निश्चित करणे आदी बाबींवर भर देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.तसेच बारव संवर्धनासाठी कार्यरत संस्था, अभ्यासक, विद्यार्थी आणि स्वयंसेवी घटक यांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळा व शिबिरे आयोजित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी प्रशिक्षण क्षेत्रातील अनुभवी संस्थांचे सहकार्य घेण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.राज्य शासनाच्या ‘मित्रा’ संस्थेमार्फत जागतिक बँकेकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून बारव संवर्धनासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचेही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा