Kalyan Crime News : कल्याणमध्ये टवाळखोरांचा हैदोस! गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीला बेदम मारहाण, डोक्यात बाटल्या फोडल्या

कल्याण: कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा टवाळखोरांची दहशत समोर आली आहे. गार्डनमध्ये बसून गप्पा मारत असलेल्या तरुण-तरुणीवर ४ ते ५ जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडण्यात आल्या, तर त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या तरुणीलाही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेत राहणारा तेजस चव्हाण हा जिम ट्रेनर असून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो आपल्या मैत्रिणीसोबत केडीएमसीच्या ड प्रभाग कार्यालयाच्या आवारातील उद्यानात बसला होता. दोघे गप्पा मारत असताना अचानक चार ते पाच तरुणांचे टोळके तेथे आले. सुरुवातीला त्यांनी तेजसच्या हातातील मोबाईल घेतला. मोबाईल घेऊन ते निघून जात असताना तेजसने त्यांना मोबाईल परत देण्यास सांगत विरोध केला. त्यानंतर संबंधित तरुणांनी मोबाईल परत केला आणि तेथून निघून गेले.


मात्र काही वेळानंतर हेच तरुण पुन्हा उद्यानात परत आले. त्यांनी तेजससोबत वाद घालण्यास सुरुवात केली आणि अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. टोळक्याने तेजसला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या. या हल्ल्यात तेजस गंभीर जखमी झाला. दरम्यान, त्याच्यासोबत असलेल्या तरुणीने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिलाही मारहाण केली. आरोपींनी तिच्यावर लाथाबुक्क्यांचा वर्षाव केल्याचे सांगितले जात आहे.



या घटनेनंतर जखमी तेजसला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तेजस चव्हाण यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चार ते पाच अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.


दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वाढत्या टवाळखोरांच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी उद्यान आणि सार्वजनिक ठिकाणी पोलिस गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

Bombay High Court : नितीन गडकरींशी संबंधित बदनामीकारक मजकूर त्वरित हटवा!

मुंबई उच्च न्यायालय; डीपफेक व्हिडिओ आणि आक्षेपार्ह मजकूर हटवण्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना निर्देश मुंबई :

Nashik : नाशिक महापालिकेने ११,६०९ खड्डे बुजवले, रस्ते दुरुस्तीची मोहीम युद्धपातळीवर

Nashik : मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या वाढली असतानाही नाशिक महानगरपालिकेने (Nashik Municipal Corporation)

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या ४ मंत्र्यांना शेवटचा अल्टीमेटम

- कामगिरीत सुधारणा झाली नाही तर नारळ देणार; पक्षवाढ आणि जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने उपमुख्यमंत्री

Amruta Khanvilkar Himanshu Malhotra : अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांच्यात बिनसलं? १८ महिन्यांपासून राहतात वेगळे; ११ वर्षांच्या संसारानंतर काडीमोड घेणार ?

मुंबई : ग्लॅमर आणि झगमगाटाने वेढलेल्या सिनेसृष्टीतील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य खरोखरच तितके सुखी आणि चमकदार

Mumbai Doctors Strike : मुंबईत निवासी डॉक्टरांचा संप; ओपीडी बंद, रुग्णांचे हाल सुरू

मुंबई : मुंबईतील महापालिका रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपामुळे हजारो रुग्णांना मोठा मनस्ताप सहन

Nashik : नाशिकचे ‘उधमाळ’ ठरणार पहिले आंतरराष्ट्रीय ‘डार्क स्काय समुदाय' गाव

Nashik : पर्यटनाने समृद्ध असलेले , हिरवाईने नटलेले आणि अध्यात्मिक घटनांचा वारसा लाभलेल्या नाशिकला आता आणखी नवी ओळख