BMC ने मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांसाठी सुरू केली कूलिंग ट्रीटमेंट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : अतिउष्णतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि झाडांवर ताण वाढतो. परिणामी, झाडांची मुळे कमकुवत होऊन जमिनीवरील पकड सैल पडण्याची शक्यता वाढते. तसेच झाडांच्या फांद्या कोरड्या व ठिसूळ होऊन तुटण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून झाडांना नियमित पाणी देण्यावर विशेष भर देण्यात येत असून सार्वजनिक ठिकाणांतील झाडांना महानगरपालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या झाडांचे संवर्धन होण्यासाठी संपूर्ण उन्हाळ्यात या झाडांना पाणी शिंपडण्यासाठी पुढाकार का घ्यावासा वाटत नाही नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.



वाढत्या तापमानाचा मुंबईतील वृक्षसंपदेवर प्रतिकूल परिणाम होऊ नये तसेच मुंबईकरांना गारवा मिळावा, या उद्देशाने महानगरपालिकेकडून झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. झाडांच्या मुळांना पुरेसे पाणी न मिळाल्यास ती कमकुवत होऊन झाडे उन्मळून पडण्याची शक्यता निर्माण होते. ही बाब लक्षात घेऊन झाडांसाठी असे पाणी पुरवून संजीवनी देण्यासाठी महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे. पिण्यासाठी अयोग्य असलेले, परंतु झाडांसाठी पोषक असलेले पाणी यासाठी वापरण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणांतील झाडांना महानगरपालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर, खासगी क्षेत्रातील झाडांसाठी संबंधित गृहनिर्माण संस्थांनी पाणीपुरवठा करावा, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.



महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रस्ते स्वच्छता मोहिमेदरम्यान पाण्याच्या टँकरद्वारे झाडांना पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जी दक्षिण विभागात केशवराव खाड्ये मार्ग तसेच सांताक्रुझ व जुहू परिसरात स्वच्छता अभियानासोबत झाडांना पाणी देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. उद्यान विभागाकडूनही मुंबईतील विविध भागांत झाडांची निगा राखणे, आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठा करणे तसेच झाडांच्या आरोग्याची पाहणी करणे, ही कामे सातत्याने सुरू आहेत. विशेष म्हणजे ज्या झाडांना पाणी घातले जात आहे, त्या झाडांच्या बुंध्याभोवती मातीचाच थर नसून मुळे उघडी पडू लागली आहे, तिथे केवळ पाणी शिंपण्याचे काम केले आहे. त्यामुळे माती अभावी हे झाड कधीही जमिन सोडून उन्मळून पडू शकते. त्यामुळे झाडाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतानाच ते ताठ मानेने उभे राहावे यासाठी झाडांच्या बुंध्याभोवती माती टाकण्याचा प्रयत्न मात्र महापालिका प्रशासनाकडून केला जात नसल्याचे दिसून येत आहे.



वृक्षतज्ज्ञांच्या मते, झाडांना वेळेवर पाणी मिळाल्यास त्यांच्या अंतर्गत पाणी वहन प्रक्रियेस मदत होते व उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी होतो. त्यामुळे फांद्या सुकणे, ठिसूळ होणे किंवा झाडांची स्थिरता कमी होणे यांसारख्या समस्या काही प्रमाणात टाळता येतात. उन्हाळ्यात झाडांचे जतन करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या परिसरातील तसेच गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील झाडांना वेळोवेळी पाणी घालावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा