Pune Young woman's number leaked : पुण्यात धक्कादायक प्रकार! हॉटेलच्या QR कोडमधून तरुणीचा नंबर लीक, मध्यरात्री आले वैयक्तिक मेसेज

पुणे: डिजिटल युगात हॉटेलमध्ये गेल्यानंतर मेन्यू पाहण्यासाठी QR कोड स्कॅन करणं आता सर्वसामान्य बाब झाली आहे. मात्र, हीच सोपी आणि सोयीची वाटणारी प्रक्रिया तुमच्या वैयक्तिक माहितीला किती मोठा धोका निर्माण करू शकते, याचा धक्कादायक अनुभव पुण्यातील एका तरुणीला आला आहे. पुण्यातील एफसी रोडवरील (FC Road) एका नामांकित हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे ग्राहकांच्या गोपनीयतेचा आणि विशेषतः महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


नेमकं काय घडलं?


मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिका दत्ता नावाची तरुणी २८ एप्रिल रोजी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत एफसी रोडवरील (FC Road) एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली होती. हॉटेलमध्ये पेपर मेन्यूऐवजी डिजिटल मेन्यूची सुविधा देण्यात आली होती. त्यामुळे मेन्यू पाहण्यासाठी तिने टेबलावर ठेवलेला QR कोड स्कॅन केला. साधारणपणे ग्राहकांना डिजिटल मेन्यू उघडण्यासाठी मोबाईल नंबर टाकावा लागतो, त्याचप्रमाणे ऋषिकानेही आपला नंबर नोंदवला.


मात्र, त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. त्याच रात्री उशिरा ऋषिकाला एका अनोळखी नंबरवरून वैयक्तिक मेसेज येऊ लागले. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण वारंवार मेसेज येत असल्याने तिला संशय आला. संबंधित व्यक्ती तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचं तिच्या लक्षात आलं.






हॉटेल कर्मचाऱ्यानेच चोरला नंबर?


ऋषिकाने या प्रकरणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, मेसेज करणारी व्यक्ती ही त्याच हॉटेलमध्ये काम करणारी कर्मचारी असल्याचं समोर आलं. आरोपानुसार, हॉटेलच्या QR कोड सिस्टीममध्ये ग्राहकांची माहिती उपलब्ध होत होती आणि त्याचाच गैरवापर करून संबंधित कर्मचाऱ्याने ऋषिकाचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर तिला वैयक्तिक मेसेज पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.


या संपूर्ण प्रकारामुळे ऋषिकाला मोठा मानसिक धक्का बसला. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा अनुभव मांडला आणि ग्राहकांच्या डेटाची सुरक्षितता किती धोक्यात आहे, याबाबत प्रश्न उपस्थित केले.



हॉटेल प्रशासनावरही प्रश्नचिन्ह


या प्रकारानंतर ऋषिकाने हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हॉटेल प्रशासनाने तोंडी उत्तर देत त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्याचं सांगितलं. मात्र, याबाबत कोणताही अधिकृत लेखी पुरावा किंवा माफीनामा देण्यास हॉटेलने नकार दिल्याचा दावा ऋषिकाने केला आहे.


दरम्यान, वाढत्या वादानंतर हॉटेलने सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ग्राहकांच्या सुरक्षिततेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो, असंही हॉटेलने स्पष्ट केलं आहे.


QR कोड सिस्टीमवरून नवा वाद


या घटनेनंतर QR कोड आधारित डिजिटल मेन्यू सिस्टीमबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांना मेन्यू पाहण्यासाठी मोबाईल नंबर देणे बंधनकारक असते. मात्र, हा डेटा नेमका कुठे साठवला जातो, कोणाला उपलब्ध असतो आणि त्याचा वापर कसा केला जातो, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती ग्राहकांना दिली जात नाही.


सोशल मीडियावर अनेकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला असून काहींनी तर “पेपर मेन्यू नसलेल्या हॉटेलमध्ये जाणार नाही,” अशी भूमिका घेतली आहे. ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होण्याची भीती आता अधिक वाढली आहे.


महिला सुरक्षेचा गंभीर प्रश्न


पुण्यासारख्या शहरात अशा घटना समोर येणं चिंतेची बाब मानली जात आहे. महिलांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून त्यांना त्रास देण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता हॉटेल, कॅफे किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी QR कोड स्कॅन करताना नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः कोणतीही वैयक्तिक माहिती देण्यापूर्वी ती कितपत सुरक्षित आहे, याची खात्री करून घेणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "