Petrol-Diesel Price Hike : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा मोठा झटका! मुंबईत पेट्रोल १०६ पार, जाणून घ्या नवे दर

मुंबई : देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी शुक्रवार, १५ मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे ३ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आली असून देशातील प्रमुख महानगरांमध्ये इंधनाचे नवे दर लागू झाले आहेत.


मुंबईत पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांची वाढ झाली असून आता पेट्रोलचा दर १०६.६८ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर डिझेलचा दर ३.११ रुपयांनी वाढून ९३.१४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे.



दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ९७.७७ रुपये प्रतिलिटर झाला असून डिझेल ९०.६७ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. कोलकात्यात पेट्रोल १०८.७४ रुपये आणि डिझेल ९५.१३ रुपये प्रतिलिटर झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०३.६७ रुपये तर डिझेल ९५.४७ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.


इंधन दरवाढीमागे पश्चिम आशियातील तणाव, वाढलेले जागतिक कच्च्या तेलाचे दर आणि तेल कंपन्यांवर वाढलेला आर्थिक ताण ही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे. भारत सरकारकडे सध्या सुमारे ६० दिवसांचा इंधनसाठा आणि ४५ दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


देशातील काही प्रमुख शहरांतील पेट्रोलचे नवे दर पुढीलप्रमाणे आहेत:




  • नवी दिल्ली-९७.७७ रुपये(+३.००)

  • कोलकाता-१०८.७४ रुपये(+३.२९)

  • मुंबई-१०६.६४ रुपये(+३.१०)

  • चेन्नई-१०३.९० रुपये(+३.१०)

  • गुरुग्राम-९८.२९ रुपये(+२.९९)

  • नोएडा-९८.०४ रुपये(+३.३०)

  • बेंगळुरू-१०६.१७ रुपये(+३.२१)

  • भुवनेश्वर-१०४.५७ रुपये(+३.६०)

  • चंदीगड-९७.२७ रुपये (+२.९७)

  • हैदराबाद-११०.८९ रुपये(+३.३९)

  • जयपूर-१०८.१९ रुपये (+३.१६)

  • लखनऊ-९७.५८ रुपये(+२.८५)

  • पाटणा-१०८.५५ रुपये (+३.०१)

  • तिरुवनंतपुरम-११०.७५ रुपये(+३.३७)


डिझेलचे नवे दर:




  • नवी दिल्ली- ९०.६७ रुपये(+३.००)

  • कोलकाता- ९५.१३ रुपये(+३.११ रुपये)

  • मुंबई- ९३.१४ रुपये(+३.११ रुपये)

  • चेन्नई- ९५.४७ रुपये(+३.०८ रुपये)

  • गुरुग्राम- ९०.७७ रुपये(+३.०० रुपये)

  • नोएडा- ९१.३१ रुपये(+३.५० रुपये)

  • बेंगळुरू- ९४.१० रुपये(+३.११ रुपये)

  • भुवनेश्वर- ९६.११ रुपये(+३.५६ रुपये)

  • चंदीगड- ८५.२५ रुपये(+२.८० रुपये)

  • हैदराबाद- ९८.९६ रुपये(+३.२६ रुपये)

  • जयपूर- ९३.४३ रुपये(+२.९४ रुपये)

  • लखनऊ- ९०.८७ रुपये(+३.०१ रुपये)

  • पाटणा- ९४.६३ रुपये(+२.८५ रुपये)

  • तिरुवनंतपुरम- ९९.६३ रुपये(+३.३७ रुपये)

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे