NEET UG 2026 : नीट पेपरफुटी प्रकरणी सूत्रधाराला पुण्यातून अटक

पुणे : नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने पुण्यातून रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला अटक केली आहे. तो नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने परीक्षा प्रक्रियेत सहभागी होता आणि त्याच्याकडे प्रश्नपत्रिकाही उपलब्ध होत्या. यामुळेच पी. व्ही. कुलकर्णी हा पेपरफुटी प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा संशय आहे. सीबीआय या प्रकरणी पुढील तपास करत आहे.



एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील निवासस्थानी विशेष कोचिंग क्लासच्या निमित्ताने पी. व्ही. कुलकर्णीने विद्यार्थ्यांना फोडलेल्या पेपरवरूनच प्रश्न विचारले होते. सराव परीक्षा घेत असल्याचे नाटक करून पी. व्ही कुलकर्णीने चतुराईने पेपर फोडला होता. या प्रकरणात सीबीआयने प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या लोकांची यादी शिक्षण मंत्रालयाकडे मागणार आहे.



प्राथमिक चौकशीअंती सीबीआयने कुलकर्णीला पुण्यात अटक करून दिल्लीला नेले. कुलकर्णीने घेतलेल्या विशेष कोचिंग क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी लाखो रुपये मोजल्याची माहिती सीबीआयच्या हाती आली आहे. या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे. सीबीआयने मनीषा वाघमारेसह आणखी एका व्यक्तीला पुण्यातून अटक केली आहे. कुलकर्णीने वाघमारेच्या मदतीने विशेष कोचिंग क्लासेस आयोजित केले होते. या विशेष कोचिंग क्लासेसमध्ये तो फुटलेल्या पेपरमधील प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे सांगत होता, अशी माहिती हाती आल्यानंतरच सीबीआयने कुलकर्णीची चौकशी सुरू केली आणि संशय बळावताच त्याला अटक केली.



पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने लेखी तक्रार केली. यानंतर सीबीआयने १२ रोजी गुन्हा नोंदवला आणि तपास सुरू केला. संशयास्पद कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल जप्त केले. जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर येथे ठिकठिकाणी कारवाई करून सीबीआयने एकूण सात जणांना अटक केली. या कारवाईनंतर सीबीआयने आता निवृत्त प्राध्यापक पी. व्ही कुलकर्णी याला अटक केली आहे.



याआधी पेपरफुटीच्या प्रकरणात सीबीआयने शिवराज माटेगांवकर यांची तब्बल ११ तास चौकशी केली. लातूर येथील माटेगांवर आरसीसी कोचिंग क्लासेसच्या महाराष्ट्रात अनेक शाखा आहेत. वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक कोचिंग क्लासेस ते घेतात. या क्लासेसमार्फत जी मॉक टेस्ट (सराव चाचणी) घेण्यात आली, त्या सराव चाचणीच्या प्रश्नपत्रिकेत नीट परीक्षेत आलेल्या प्रश्नांचा देखील समावेश होता, असे समोर आले आहे. यानंतर माटेगांवकर यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर हाती आलेली माहिती तसेच आधी अटक केलेल्या सात जणांनी दिलेली माहिती यावरून सीबीआयला निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याचा संशय आला. अखेर त्याला सीबीआयने उलटसुलट प्रश्न विचारले. समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यामुळे तपास अधिकाऱ्यांचा संशय बळावला आणि कुलकर्णीला अटक करण्यात आली.



नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी सीबीआयने अटक केलेले आठ आरोपी




  1. पी. व्ही. कुलकर्णी - संशयित सूत्रधार, पुण्यातून अटक

  2. शुभम खैरनार - नाशिक (महाराष्ट्र), मूळ प्रश्नसंच मिळवून यश यादवला संभाव्य प्रश्नांची प्रश्नपत्रिका म्हणून दिल्याचा आरोप

  3. यश यादव - गुरुग्राम (हरियाणा), टेलिग्रामवर पीडीएफ स्वरूपात लीक झालेली प्रश्नपत्रिका शेअर केल्याचा आरोप

  4. मंगिलाल बिवाल - जयपूर (राजस्थान), मुलासाठी प्रश्न मिळवण्याकरिता १०-१२ लाख रुपये मोजल्याचा आरोप

  5. विकास बिवाल - जयपूर (राजस्थान), मंगिलाल यांचा मुलगा, जो यश यादवचा सीकरमधील एका कोचिंग सेंटरमधील मित्र

  6. दिनेश बिवाल - जयपूर (राजस्थान), अनेक राज्यात माहिती पसरविण्याचा आरोप

  7. मनीषा वाघमारे - पुणे (महाराष्ट्र), व्यवसायाने ब्युटिशियन, परीक्षेपूर्वी २१ बँक खात्यांमधून मोठी रक्कम काढल्याचा आरोप

  8. धनंजय लोखंडा - अहिल्यानगर (महाराष्ट्र), पेपरफुटी प्रकरणातील एक आरोपी

Comments
Add Comment

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच

PM Modi SCO Summit : बिश्केकमध्ये पंतप्रधान मोदींची पुतीन, पेझेश्कियन यांच्याशी भेट; वर्ल्ड नोमॅड गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यालाही उपस्थिती

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या किर्गिस्तानच्या दौऱ्यावर असून, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन

Nashik : माणुसकीला काळिमा ! पैशांसाठी ५ दिवसांच्या नवजात बाळाचा आईनेच केला सौदा

Nashik Crime News : नाशिकमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात मातृत्वाला काळीमा फासणारी घटना

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Badlapur Dahi Handi 2026 Accident : सातव्या थरावरून सलामी देताना चिमुकल्या गोविंदाचा सेफ्टी बेल्ट तुटला आणि...; बदलापूरमध्ये अनर्थ टळला

बदलापूर : दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बदलापूरमध्ये एक थरारक घटना घडली. ‘माखन चोर दहीकाला उत्सवा’दरम्यान