नवी दिल्ली : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA) वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या NEET-UG 2026 परीक्षेच्या नव्या तारखेची अधिकृत घोषणा केली आहे. आता ही पुर्नपरीक्षा रविवार, २१ जून रोजी पार पडणार आहे. यापूर्वी ३ मे रोजी देशभरातील ५५१ आणि परदेशातील १४ शहरांमधील ५,४०० हून अधिक केंद्रांवर तब्बल २२.७९ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटीच्या संशयावरून १२ मे रोजी परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. यावर स्पष्टीकरण देताना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, "१२ मे रोजी जेव्हा आम्हाला पेपरफुटीचे प्राथमिक संकेत मिळाले, तेव्हा एकाही अपात्र उमेदवाराची निवड होऊ नये, हाच आमचा मुख्य उद्देश होता. अशा गैरप्रकारांबाबत आमचे धोरण 'शून्य सहनशीलतेचे' (Zero Tolerance) आहे. दुर्दैवाने अशी घटना घडली, परंतु विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता आम्ही तत्परतेने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला."
मुंबई : माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा ...
शुल्कात सवलत आणि वेळेत वाढ
#WATCH | Delhi | Union Education Minister Dharmendra Pradhan says, "The new dates of the re-examination have been declared for June 21st... The exam took place on 3rd May and on 7th May, NTA received a complaint that the guess paper had some questions that were present in the… pic.twitter.com/hTrzstq1mH
— ANI (@ANI) May 15, 2026
नव्याने होणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये आणि त्यांच्यावर मानसिक किंवा आर्थिक ताण पडू नये, यासाठी शिक्षण मंत्रालयाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. शिक्षणमंत्री प्रधान यांनी जाहीर केल्यानुसार, या पुर्नपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून एकही रुपया अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. उलट, आधी भरलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाणार आहे. याव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्रासाठी नव्याने शहराची निवड करण्याची विशेष मुभा दिली जाईल. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षेच्या वेळेतही १५ मिनिटांची वाढ करण्यात आली असून, आता ही परीक्षा दुपारी २:०० वाजता सुरू होऊन सायंकाळी ५:१५ वाजेपर्यंत चालेल. या परीक्षेची नवीन प्रवेशपत्रे (Admit Cards) १४ जूनपर्यंत अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली जातील.
सीबीआयची धडक कारवाई आणि ७ जणांना अटक
दुसरीकडे, नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) अत्यंत वेगाने करत असून याप्रकरणी आतापर्यंत सात जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सीबीआयने ५ मुख्य आरोपींना दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हजर केले. यामध्ये राजस्थानचे मंगीलाल बिनवाल, दिनेश बिनवाल आणि विकास बिनवाल, हरियाणातील गुरुग्रामचा यश यादव आणि महाराष्ट्रातील नाशिकचा शुभम खैरनार यांचा समावेश आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाने या सर्व पाचही आरोपींना सात दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या आंतरराज्यीय रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रातही सापडले असून, सीबीआयच्या पथकाने पुण्यातून मनीषा वाघमारे या ब्युटिशियनला, तर नाशिकमधून धनंजय लोखंडे यालाही अटक केली आहे.






