दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला २० मेपासून प्रारंभ

प्रवेश प्रक्रिया वेळेत राबविण्यासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाचे कालबद्ध नियोजन


उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील


मुंबई: दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता प्रवेश प्रक्रिया दिनांक २० मे २०२६ पासून सुरू होत आहे. ही प्रवेश प्रक्रिया वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेणाऱ्या विविध विद्याशाखांमध्ये तंत्र शिक्षण ही अत्यंत महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमधून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञ, अभियंता तसेच उद्योजक होण्याची संधी उपलब्ध होते. दहावीनंतर तीन वर्षांच्या कालावधीचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याबरोबरच रोजगार व उद्योग क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटमधूनच रु. 1 लाख प्रति महिना पगाराच्या नोक-या औद्योगिक क्षेत्राकडून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे.

तंत्रशिक्षण संचालकांच्या मार्गदर्शनाने, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून पदविका अभ्यासक्रमासाठी NEP 2020 अनुरूप अद्यावत 'K Scheme' अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
Outcome-based, Credit System (६ सत्रे, एकूण १२० क्रेडिट्स)
इंग्रजी व मराठी द्विभाषिक शिक्षण व परीक्षा पर्याय
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व कौशल्य विकासासाठी Soft Skills, Social & Life Skills, Yoga, Entrepreneurship, Indian Knowledge System, Essence of Indian Constitution, Environment & Sustainability, Management, Entrepreneurship & Startup, Seminar इ. विषयांचा अंतर्भाव
IoT, Robotics, Drone Technology, Python Programming, ५G, Cloud Computing, Data Analytics, Cold Chain Management, EV technology, Machine Learning, AI, Green Building, Energy Conservations, UI/UX Designing इ. उदयोन्मुख तंत्रज्ञानांवर आधारित विषयांचा कौशल्य वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून अभ्यासक्रमात समावेश
औद्योगिक प्रशिक्षण ६ आठवड्यांवरून वाढवून १२ आठवडे
NCrF नुसार NAD (National Academic Depository) च्या Academic Bank of Credits (ABC) मध्ये विद्यार्थ्यांचे credits जमा करण्यात येतात.
विद्यार्थ्यांमध्ये Technical skills रुजविण्याकरिता प्रत्येक सत्रात Micro Projects आणि अंतिम सत्रात Capstone Project चा अंतर्भाव




तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकास करण्याच्या दष्टीकोनातून 9 Centres of Excellence (Robotics, IoT, 3D Printing), 41 Multipurpose Computer Centres व 5 E-Yantra Labs ची स्थापना करण्यात आलेली आहे.तंत्रशिक्षण संचालनालय व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अद्यावत अभ्यासक्रम व विविध उपक्रमांमुळे शैक्षणिक वर्ष 20२२-२३ मध्ये 80 टक्के असलेली पदविका अभ्यासक्रमांच्या एकुण प्रवेशित विद्यार्थ्यांची टक्केवारी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 95 टक्के एवढी झालेली आहे.पदविका प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण तपशील तसेच प्रवेशासंबंधी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी, नावनोंदणी व अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण संचालनालयाच्या https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी