Chief Minister of Keral : अखेर सस्पेन्स संपला ! केरळमचे मुख्यमंत्री ठरले

Chief Minister of Keral : केरळमधील मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स अखेर संपला असून, काँग्रेसने (Congress ) व्ही. डी. सतीशन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. काँग्रेसचे महासचिव दीपा दासमुंशी यांनी गुरुवारी सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. व्ही. डी. सतीशन (V. D. Satishan) हे केरळमधील पुरावूर (Puravur ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार (MLA) असून, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर होते.



दीपदास मुन्शी यांनी सांगितले की, ते, अजय माकन आणि मुकुल वासनिक केरळला जात असून, आज संध्याकाळी आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पुढील निर्णय घेतले जातील. त्यांनी असेही सांगितले की, पक्षाच्या हायकमांडने हा निर्णय घेतला असून, सर्वजण त्याला पाठिंबा देत आहेत. अजय माकन यांनी सांगितले की, खासदारांसह सर्वांशी सल्लामसलत करण्यात आली आणि सविस्तर चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.


आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर (Elections ) चार राज्यांत मुख्यमंत्री पदाची शपथविधी प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, केरळमध्ये मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेसमध्ये (Congress ) जोरदार चर्चांना उधाण आले होते. या शर्यतीत के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला आणि व्ही. डी. सतीशन यांची नावे चर्चेत होती. अखेर जवळपास दहा दिवसांच्या बैठका आणि चर्चेनंतर काँग्रेसने सतीशन यांच्यावर विश्वास दाखवला.



व्ही डी सतीशन कोण आहेत ?


२००१ पासून परवूर विधानसभा मतदारसंघातून सातत्याने विजयी होणारे व्ही. सी. सतीशन (V. D. Satishan) हे मागील विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते. यावेळी त्यांनी आपल्या परवूर विधानसभा मतदारसंघात डाव्या पक्षाचे ई. टी. टायसन यांचा २०,००० मतांच्या फरकाने पराभव केला. ते केरळ उच्च न्यायालयात (Kerala High Court) वकीलही राहिले असून डाव्यांचे एक प्रमुख विरोधक मानले जातात. त्यांचे वय ६१ वर्षे आहे. सतीसन हे महाविद्यालयीन काळापासून राजकारणात सक्रिय होते आणि त्यांनी एनएसयूआयचे (NSUI) सचिव म्हणून काम केले आहे.


गेली २५ वर्षे केरळम विधानसभेचे सदस्य असलेले व्ही. डी. सतीशन एकही निवडणूक हरलेले नाहीत आणि त्यांनी सलग सहा वेळा आपल्या विरोधकांचा पराभव केला आहे. मात्र, त्यांनी अद्याप कोणत्याही सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलेले नाही. ते मागील विधानसभेत विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी अनेक प्रसंगी आपल्या पक्षाची भूमिका जोरदारपणे मांडली.

Comments
Add Comment

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज