NEET Paper Leak Case : शुभम खैरनारचे कुटुंब नॉट रिचेबल, 'या' मोठ्या कारणामुळे शुभमचा मोठा भाऊही पोलिसांच्या रडारवर

NEET Paper Leak Nashik Connection : नीट पेपर फुटीप्रकरणी आतापर्यंत देशभरात सीबीआयने 6 आरोपींना अटक केली आहे. तर देशभरात अनेक ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत. नाशिकमधून शुभम खैरनार (shubham khairnar), अहिल्यानगरहून धनंजय लोखंडे (dhananjay lokhande), जयपूरमधून मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल तर गुरुग्राममधून यश यादव अशा एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तसेच मोबाईल फोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि गुन्हेगारी पुरावा दर्शवणारी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. (NEET Paper Leak Nashik Connection)



शुभमच्या मोठ्या भावाकडे गावठी कट्टा


दरम्यान, आता या प्रकरणातील संशयित शुभम खैरनार (shubham khairnar) याचे कुटुंब नॉट रिचेबल (Not reachable) असून त्याच्या कुटुंबाचा इतिहासही समोर आला आहे. नांदगावच्या (Nandgaon) गंगाधरीत शुभमचे कुटुंब वास्तव्यास असून शुभमचा (shubham khairnar) मोठा भाऊ यापूर्वीच एका गुन्हेगारी प्रकरणात पोलिसांच्या (Police) रडारवर आहे. शुभमचा मोठा भाऊ नांदगाव (Nandgaon) येथील हमालवाडा भागात मेडिकल स्टोअर (Medical Store) चालवतो. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. (NEET Paper Leak Nashik Connection)



एकाकडे पेपर तर एकाकडे गावठी कट्टा


एका बाजूला भाऊ गुन्हेगारी (Criminal) पार्श्वभूमीशी जोडला गेलेला असताना, दुसरीकडे शुभम आता पेपर फुटीच्या आंतरराज्य रॅकेटमध्ये अडकल्याने खैरनार कुटुंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शुभमचे वडील वैद्यकीय क्षेत्रातील अल्प ज्ञानावर आधारित छोटा-मोठा व्यवसाय करतात. त्यांच्याच सांगण्यावरून शुभम वैद्यकीय शिक्षण (Medical education) घेत होता, असे समजते. खैरनार कुटुंबाची (Khairnar family) नांदगाव येथे एक ते दीड एकर शेती असून, वर वर पाहता हे कुटुंब सामान्य बाटते. मात्र, घरातील दोन्ही मुलांचे कारनामे पाहता, या सामान्य कुटुंबाचे (Family) धागेदोरे नेमके कोठे आणि कोणाशी जोडले गेले आहेत, याचा तपास आत्ता सीबीआय करत आहे. (NEET Paper Leak Nashik Connection)



शुभम खैरनार सध्या सीबीआयच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. त्याने नाशिक आणि परिसरात कोणाला पेपर पुरवले किंवा त्याचे मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या कारवाईनंतर नांदगाव येथील त्याचे संपूर्ण कुटुंब सध्या नॉट रिचेबल (Not reachable)  झाले असून घराला टाळे असल्याची माहिती समोर येत आहे.

Comments
Add Comment

Nashik : गोकुळ गितेंच्या विजयात चोरट्यांनाही डाव साधला; ७ लाखांचे दागिने चोरी

Nashik : विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या आमदार गोकुळ गिते (Gokul Gite) यांच्या विजयाच्या जल्लोषादरम्यान चोरट्यांनी

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Maharashtra Police Transfers : राज्यातील ११५ DYSP अधिकाऱ्यांच्या बदल्या, गृह विभागाचे आदेश जारी

मुंबई : राज्य सरकारने पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Police - DYSP) आणि समकक्ष दर्जाच्या तब्बल ११५ पोलीस अधिकाऱ्यांच्या

Lohagad Massacre : ३१ मे लाच केला होता खुनाचा प्रयत्न; वडिलांचा खळबळजनक दावा

पुणे: पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

Mumbai Monorail : मुंबई मोनोरेल पुन्हा धावणार! ९ महिन्यांनंतर सेवांना हिरवा कंदील; भाडेवाढीचाही प्रस्ताव

मुंबई : तब्बल ९ महिन्यांच्या खंडानंतर मुंबई मोनोरेल (Mumbai Monorail) सेवा पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Mumbai Monsoon Red Alert : मुंबई आणि पालघरला 'रेड अलर्ट'; पुढील ३ तास धोक्याचे; विजांचा कडकडाट, ताशी ६० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई : आज म्हणजेच २४ जून बुधवारी भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत