Unauthorized Hawkers : टँक पाखाडी मार्ग आणि हाफिज अली खान मार्गावरील अनधिकृत फेरीवाले, गॅरेज व भंगार विक्रेत्‍यांवर BMC ची कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  ‘ई’ विभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक २१२ मधील वॉटर स्‍ट्रीट कॉर्नर, टँक पाखाडी मार्ग व हाफिज अली बहादूर खान मार्गावरील अनधिकृत फेरीवाले, गॅरेज व भंगार व्यावसायिक तसेच इतर मिळून सुमारे ४० अतिक्रमणांवर महानगरपालिकेच्या ‘ई’ विभागाकडून कारवाई करण्यात आली. अनधिकृत बाकडे, स्‍टॉल्‍स, शेडस् यांच्‍यावर कारवाई करून अतिक्रमण निर्मूलन करण्‍यात आले.




उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. ‘ई’ विभागातील वॉटर स्‍ट्रीट कॉर्नर, टँक पाखाडी मार्ग व हाफिज अली बहादूर खान मार्ग परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेच्या ‘ई’ प्रशासकीय विभाग (वॉर्ड) अंतर्गत कार्यरत परिरक्षण, अतिक्रमण निर्मूलन या विभागांनी संयुक्तरित्या मोहीम हाती घेतली. या कारवाईदरम्यान अनधिकृत विक्रेत्‍यांवर कारवाई करण्‍यात आली. पदपथावरील अतिक्रमण हटविण्यात आले. परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आली. तसेच, रस्‍ता रहदारीसाठी मोकळा करण्‍यात आला.



१ जेसीबी यंत्र, ०३ वाहने, २० कामगारांच्‍या सहाय्याने केलेल्‍या या कारवाईवेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाचे वरिष्ठ निरिक्षक, अनुज्ञापन निरिक्षक, वाहन व कर्मचारी तसेच परिरक्षण विभागाचे दुय्यम अभियंता, कनिष्ठ अभियंता, वाहन व कर्मचारी उपस्थित होते. नागपाडा पोलीस ठाण्याकडून यावेळी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, अनधिकृत बांधकामे आणि अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Cab vs Auto : बोरीवली स्टेशनबाहेर कॅबचालकाला धमकी? व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Mumbai : एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईतील बोरीवली स्टेशन ईस्टच्या प्रवेशद्वारावर एक ऑटोचालक एका कॅबचालकाला

Viral Video : आता काय बोलायचं ? चक्क फ्लायओव्हरच्या उंच खांबावर कुटुंबाने थाटला संसार; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या

Justice Sunil Shukre : न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांनी मंगळवारी राज्याच्या

CM Devendra Fadnavis : मलईदार खात्यांवर वर्षानुवर्षे कब्जा करणारे ३१४ अधिकारी रडारवर

- मुख्यमंत्री कार्यालयाकडून यादी तयार; राजकीय वरदहस्त असलेल्या अधिकाऱ्यांवर करडी नजर मुंबई : मंत्रालय आणि राज्य

Vaishya Vani Community : वैश्य वाणी समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक; मंत्री अतुल सावे यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई : वैश्य वाणी समाजातील पात्र व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, सवलती आणि शासकीय लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी

BMC : रस्ते अभियंत्यांना महापालिकेने खड्डे शोधण्यासाठी रस्त्यावर पिटाळले

आगमन, विसर्जन मार्ग चालत जावून पाहणी करण्याचे दिले निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायांचे आगमन येत्या