Sonu Nigam : चाहत्याने थेट गाठलं स्टेज, सोनू निगम यांनी संयमाने हाताळली परिस्थिती

कोल्हापूर : लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) यांचे लाखो चाहते आहेत. त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात आणि चाहत्यांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळतो. नुकत्याच कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या त्यांच्या एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान घडलेल्या घटनेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यक्रम सुरू असतानाच एक चाहता अचानक स्टेजवर चढला आणि सोनू निगम यांच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. या संपूर्ण प्रकारानंतर आता स्वतः सोनू निगम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.



लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अचानक चाहत्याची एन्ट्री


गेल्या आठवड्यात कोल्हापूरमध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये सोनू निगम आपल्या लोकप्रिय गाण्यांचं सादरीकरण करत होते. प्रेक्षकही मोठ्या उत्साहात त्यांच्या गाण्यांचा आनंद घेत होते. मात्र, परफॉर्मन्स रंगात आला असतानाच एक चाहता अचानक स्टेजवर चढला. त्याने थेट सोनू निगम यांच्या जवळ जात त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे काही क्षणांसाठी कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि सोनू निगम यांना गाणं थांबवावं लागलं.


दरम्यान, सुरक्षा रक्षक त्या चाहत्याला स्टेजवरून खाली घेऊन जाण्यासाठी पुढे सरसावले. परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता असतानाच सोनू निगम यांनी अत्यंत शांतपणे आणि संयमाने परिस्थिती हाताळली. त्यांनी त्या चाहत्यावर राग व्यक्त केला नाही, उलट हसत परिस्थिती हलकी करण्याचा प्रयत्न केला.



सोनू निगम यांची प्रतिक्रिया चर्चेत


या घटनेचा व्हिडिओ नंतर सोनू निगम यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. व्हिडिओमध्ये ते गाणं सादर करत असताना अचानक मागे सरकताना दिसतात. त्यानंतर पांढरा टी-शर्ट घातलेला चाहता स्टेजवर येऊन त्यांच्या पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्या क्षणी सोनू निगम हसत प्रेक्षकांकडे पाहतात आणि मिश्कील अंदाजात म्हणतात, “व्वा, छान केलंस!”





विशेष म्हणजे, काही क्षणांनंतर तो चाहताही सोनू निगम यांच्यासोबत गाणं म्हणताना दिसतो. या व्हिडिओसोबत सोनू निगम यांनी एक खास संदेशही लिहिला. त्यांनी म्हटलं, “प्रेक्षकांनो, मार खाण्याची कामं का करता?… मी तुम्हाला या वेळी वाचवलं, पण प्रत्येक वेळी वाचवू शकत नाही.”


सोशल मीडियावर प्रतिक्रिया


या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी त्या चाहत्याच्या कृतीवर टीका केली असून, अशा प्रकारचं वर्तन चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे सोनू निगम यांनी ज्या शांततेने आणि विनम्रतेने परिस्थिती हाताळली त्याचंही मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.


एका युझरने कमेंट करत लिहिलं, “हे फक्त सोनू निगमच करू शकतात. इतक्या शांतपणे परिस्थिती हाताळणं प्रत्येकालाच जमत नाही.” तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिलं, “तुम्ही ज्या पद्धतीने त्या चाहत्याला समजावलं आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवली, ते खरंच अप्रतिम होतं.”

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत