'Ghabadkund' Movie : ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे साकारणार रहस्यमयी ‘रंगी’

मुंबई : अनुभवी थिएटर आर्टिस्ट, कुशल मेकअप आर्टिस्ट आणि ‘आयकॉन दी स्टाईल’च्या संस्थापक सदस्य म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्मिता पायगुडे अंजुटे आता ‘घबाडकुंड’(Ghabadkund) या चित्रपटातून एका गूढ आणि प्रभावी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारत असलेला हा चित्रपट येत्या १९ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.



चित्रपटात स्मिता ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा साकारत असून, ब्लॅक मॅजिकच्या गूढ विश्वाशी जोडलेली ही भूमिका कथानकाला एक वेगळंच वळण देताना दिसणार आहे. आपल्या तीक्ष्ण नजरेने, भयावह उपस्थितीने आणि रहस्यमयी वावराने ‘रंगी’ प्रेक्षकांच्या मनात भीती आणि उत्सुकता निर्माण करणार आहे. “नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते... नाव हिचं रंगी...!” ही टॅगलाईन त्यांच्या व्यक्तिरेखेचा गूढ आणि दमदार स्वभाव प्रभावीपणे मांडते.





या भूमिकेविषयी बोलताना स्मिता पायगुडे अंजुटे म्हणाल्या, “‘घबाडकुंड’मधील ‘रंगी’ ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत खास आणि आव्हानात्मक आहे. थिएटरमधून मिळालेला अभिनयाचा अनुभव आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून मिळालेली व्यक्तिरेखा समजून घेण्याची दृष्टी या भूमिकेला आकार देताना खूप उपयोगी पडली.” ब्लॅक मॅजिकच्या पार्श्वभूमीवर उभी राहणारी ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Maharashtra Epstein Files Teaser : 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा टीझर रिलीज; खरात प्रकरणावर आधारित सिनेमाची उत्सुकता वाढली

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेत राहिलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर आधारित

Kareena Kapoor Pregnancy : करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? नणंद सबा पटौदीने अखेर मौन सोडलं

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कथित तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार