YouTuber Swanandi Sardesai : स्वानंदी सरदेसाईचा लग्नानंतरचा पहिला व्लॉग चर्चेत; “आता मी अकोल्याची सून...”

अकोला : 'ऐका ना...' म्हणत प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी लोकप्रिय यूट्यूबर (YouTuber) स्वानंदी सरदेसाई हिने अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. १९ एप्रिल रोजी अतिशय साध्या, पारंपरिक आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लग्नाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली होती.



लग्नानंतर आता स्वानंदीनं नवरा विक्रांतसोबतचा पहिला व्लॉग (Vlog) चाहत्यांसाठी शेअर केला असून, या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या व्लॉगमध्ये तिनं लग्नानंतरच्या नव्या आयुष्याबद्दल, सासरच्या आठवणींबद्दल आणि नव्या नात्यांविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला आहे.


कोकणातील संस्कृती, परंपरा आणि ग्रामीण जीवनशैली आपल्या व्हिडिओतून जपणारी स्वानंदी आता कोकणची नव्हे तर अकोल्याची सून झाली आहे. लग्नानंतर ती नवरा विक्रांतसोबत अकोल्याला सासरी गेली होती. तिथे नवीन नातेवाईकांच्या भेटीगाठी, देवदर्शन, पूजा आणि इतर पारंपरिक कार्यक्रम पार पडल्याचं तिनं व्लॉगमध्ये सांगितलं.


स्वानंदी म्हणाली, “१९ एप्रिलला आमचं लग्न झालं. ठरवून नाही, पण स्वभावत: साधेपणा आवडत असल्यामुळे आम्ही अगदी जवळच्या आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने लग्न केलं.”



पुढे ती म्हणाली, “लग्नानंतर मी सासरी अकोल्याला गेले होते. तिथे सगळ्या नवीन नातेवाईकांना भेटणं, देवदर्शन, पूजा आणि विविध कार्यक्रम झाले. आता दोन-तीन दिवसांपूर्वी पुन्हा माहेरी कोकणात आले आहे. आता इकडची देवदर्शनं आणि इतर कार्यक्रम होणार आहेत.”


स्वानंदीच्या या साधेपणाने आणि तिच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीने चाहत्यांचं पुन्हा एकदा मन जिंकलं आहे.

Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये