NEET UG 2026 Paper Leak : मोबाईल बंद करून लपलेला संशयित अखेर CBI च्या जाळ्यात; NEET पेपरफुटी प्रकरणात अहिल्यानगरमधून संशयिताला घेतले ताब्यात

अहिल्यानगर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, गेल्या २४ तासांपासून तपास यंत्रणांना चकवा देणाऱ्या संशयिताला अखेर CBI ने ताब्यात घेतले आहे. धनंजय लोखंडे असे या संशयिताचे नाव असून, त्याला आज सकाळी अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली.


amp/"> amp/" class="section-post-content-internal-post-title">Devendra Fadnavis : परदेश दौरे रद्द करा, मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्याही कमी करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्र्यांच्या लवाजम्याचा आढावा घेण्यास सुरुवात मुंबई : जागतिक आर्थिक संकट आणि ...


मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील आरोपी खैरनार याचा तो जवळचा साथीदार असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या प्रकरणात त्याची महत्त्वाची भूमिका असू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. धनंजय लोखंडे पुण्यात लपल्याची माहिती समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी शहरात मोठी शोधमोहीम सुरू केली होती. मात्र, तो सतत ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना सापडत नव्हता.


दरम्यान, संशयिताने मंगळवार दुपारपासून आपला मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे त्याचे नेमके लोकेशन शोधण्यात अडचणी निर्माण होत होत्या. तरीही CBI आणि पोलिसांनी तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशनचे जुने रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुराव्यांच्या आधारे त्याचा मागोवा घेतला. अखेर तो अहिल्यानगरमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर CBI च्या पथकाने तेथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.


amp/">
amp/" class="section-post-content-internal-post-title">Devendra Fadnavis : परदेश दौरे रद्द करा, मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्याही कमी करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; सामान्य प्रशासन विभागाकडून मंत्र्यांच्या लवाजम्याचा आढावा घेण्यास सुरुवात मुंबई : जागतिक आर्थिक संकट आणि ...


या कारवाईनंतर आता NEET पेपरफुटी रॅकेटमधील आणखी महत्त्वाच्या गोष्टी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ताब्यात घेतलेल्या संशयिताची CBI कडून सखोल चौकशी केली जाणार असून, पेपरफुटी कशी झाली, त्यामागे कोणकोण सहभागी होते, तसेच विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका कशा पोहोचवल्या गेल्या याबाबत तपास अधिक वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.


धनंजय लोखंडे हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्याचे वास्तव्य पुण्यात होते आणि तेथूनच तो इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत मोठे खुलासे होऊ शकतात.

Tags
nashikneetpaper leakNEET Paper Leak CaseAhilyanagarCBIneet 2026neet exam cancel

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व