ग्लासगो : स्कॉटलँडच्या ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२६ स्पर्धेत भारतीय बॉक्सर जादुमणी सिंहचा पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात पराभव झाला. यामुळे त्याला रौप्य पदकावर अर्थात सिल्व्हर मेडलवर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जाई डिस्कन विरुद्धच्या सामन्यात त्याचा ०-५ असा पराभव झाला.
ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या युवा खेळाडूंनी आपल्या अफाट संघर्षमय प्रवासातून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. राष्ट्रकुल ...
जादुमणी सिंह या २२ वर्षांच्या बॉस्करने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जाई डिस्कनला जोरदार टक्कर दिली. पण डिस्कनच्या प्रभावी खेळापुढे त्याचा निभाव लागला नाही. काउंटर-पंचिंग आणि अचूक स्कोरिंग शॉट्स मारत डिस्कनने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. बॉक्सर जादुमणी सिंह पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात दुसरा आला. त्याने यशाचे श्रेय बॉक्सर सरिता देवीला दिले. आतापर्यंतच्या करिअरमध्ये बॉक्सर सरिता देवीनेच मार्गदर्शन केले त्यामुळे या टप्प्यापर्यंत पोहोचू शकलो असे जादुमणी सिंहने कृतज्ञतेने सांगितले.
शुभम जुयालची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची ऐतिहासिक कमाई ग्लास्गो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मधील पॅरा-ॲथलेटिक्स ...
बालपणापासूनच सरिता देवीच्या मार्गदर्शनात बॉक्सिंगचे धडे गिरवायला सुरुवात केल्याचे जादुमणी सिंह म्हणाला. डाएट, प्रशिक्षण प्रत्येक बाबतीत सतत योग्य मार्गदर्शन करण्यावर सरिता देवीचा भर होता. यामुळेच एवढ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करणे शक्य झाल्याचे जादुमणी सिंहने सांगितले. संपूर्ण राष्ट्रकुल स्पर्धेत सरिता देवीने वेळोवेळी मार्गदर्शन केले. प्रत्येकवेळी कुठे चुकत आहे याची जाणीव करून देत सुधारण्यासाठी मार्गदर्शन केले. यामुळे अंतिम फेरीपर्यंत धडक मारणे शक्य झाल्याचे जादुमणी सिंह म्हणाला. सरिता देवीने कायम मला सुवर्ण पदकाचे स्वप्न दाखवत उत्तम खेळण्यासाठी प्रेरणा दिली, असेही तो म्हणाला.
ग्लासगो: २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी आपला दरारा कायम राखत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. भारतीय लष्कराची पहिली महिला ...
'राउंड ऑफ-32' मध्ये जादुमणी सिंहने स्कॉटलंडच्या एरन कलनला ५-० असे हरवले होते. नंतर त्याने पाकिस्तानच्या सुमामा रहमान विरुद्धही ५-० असा दणदणीत विजय मिळवला होता. उपांत्यपूर्व फेरीत अर्थात क्वार्टर फायनलमध्ये त्याने जाम्बियाच्या म्वेंगो म्वाले विरुद्धचा सामना ५-० असा जिंकला होता. तर उपांत्य फेरीत त्याने नामीबियाच्या फिलिप पुमुलो मुटाकेला हाओसेब विरुद्धचा सामना ५-० असा जिंकला होता. यामुळे अंतिम सान्यात त्याच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. पण डिस्कनच्या खेळापुढे त्याचा निभाव लागला नाही. अखेर त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. आता सप्टेंबरमध्ये होणार असलेल्या आशियाई खेळांवर अर्थात एशियन गेम्सवर (Asian Games) तसेच इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतल्याचे जादुमणी सिंहने सांगितले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय बॉक्सिंगपटूंनी आपली सुवर्ण घोडदौड कायम ठेवली आहे. महिलांच्या ६० किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात ...
मणिपूरच्या इतर अनेकांप्रमाणे जादुमणी पण फुटबॉलप्रेमी होता. पण काकाच्या सल्ल्याने तो बॉक्सिंग रिंगमध्ये उतरला. काही वर्षांपूर्वी एका जातीय दंगलीत जादुमणीच्या कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले. पण घरच्यांनी या कठीण काळातही जादुमणीचे बॉक्सिंगचे प्रशिक्षण थांबणार नाही याची खबरदारी घेतली. कुटुंब आणि प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळे अडीअडचणींतून मार्ग काढत आणि चुका सुधारत जादुमणी यशाची एक एक पायरी चढत गेला आणि ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल २०२६ अर्थात कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games) २०२६ स्पर्धेत त्याने रौप्य पदक जिंकले.


