Priti Zinta : प्रिती झिंटा संतापली, पंजाब किंग्सच्या खेळाडूवर टीका करणाऱ्यांना सुनावले

धरमशाला : आयपीएल २०२६ च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्सला प्लेऑफमध्ये प्रवेशासाठी पुढील तीन पैकी किमान दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. आतापर्यंत त्यांनी ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यांचा एक सामना पावसामुळे वाया गेला यामुळे पंजाबचे सध्या १३ गुण आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच गुरुवार १४ मे रोजी पंजाब किंग्सचा सामना मंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना धरमशाला येथे रंगणार आहे. मुंबईचे आव्हान आधीच संपले आहे. पण मुंबई जिंकली तर पंजाबचे प्लेऑफचे स्वप्न अडचणीत सापडू शकते. एवढा महत्त्वाचा सामना होण्याआधी पंजाब किंग्स भलत्याच घटनेमुळे चर्चेत आहे.पंजाब किंग्सची मालक असलेली अभिनेत्री प्रिती झिंटा संतापली आहे. संघ आणि संघातील खेळाडूंविषयी सोशल मीडियात आलेल्या काही कमेंटनना प्रितीने आक्रमक पवित्रा घेऊन उत्तर दिले आहे. यामुळे क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे.





नेमकं प्रकरण काय ?


सलग चार सामन्यांत पंजाबचा पराभव झाला. यानंतर सोशल मीडियात पंजाब संघाविषयी चर्चेला उधाण आले. काही जणांनी पंजाबचे क्रिकेटपटू सराव करत नाहीत, व्हिडीओ गेम्स खेळण्यात मग्न असतात असा आरोप केला. पंजाबचा सलामीवीर प्रभसिमरन सिंह याचे वजन १० किलोने वाढले आहे. वाढलेल्या वजनामुळे तो वेगाने धावू शकत नाही आणि बाद होतो; असाही आरोप सोशल मीडियातून झाला. या आरोपांची माहिती मिळताच प्रिती झिंटा संतापली. हेतुपुरस्सर खोटी माहिती पसरवली जात आहे, असे प्रिती म्हणाली. खेळाविषयीच्या निरोगी चर्चेचे स्वागत करतो. पण व्यक्ती, संघ किंवा ब्रँडला हानी पोहोचवण्यासाठी हेतुपुरस्सर खोट्या गोष्टी पसरवणे हे खपवून घेतले जाणार नाही. मी विश्वसनीय व्यक्ती आणि माध्यम व्यावसायिकांसह सर्वांना आवाहन करते की, माहिती प्रसारित करताना जबाबदारीने वागा. माहितीची खातरजमा करून घ्या; असे प्रिती झिंटा म्हणाली.



प्रभसिमरन सिंहची इन्स्टा स्टोरी व्हायरल


पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रभसिमरन सिंह याने एक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली आहे. यात शर्टलेस प्रभसिमरन सिंह दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओद्वारे त्याने वजन वाढल्याचा आरोप करणाऱ्यांना अप्रत्यक्षरित्या उत्तर दिल्याची चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली आहे.

Comments
Add Comment

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि

Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ९५ टक्के; मुंबई आता सुरक्षित कक्षेत

- पाणीकपात रद्दचा निर्णय १ ऑक्टोबर नंतरच मुुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील