Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण

 देशव्यापी स्पर्धेतून निवड; आध्यात्मिक वारसा आणि सांस्कृतिक अस्मितेचा संगम


मुंबई : हिंदू संस्कृतीतील सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर 'सिंहस्थ कुंभमेळा २०२६'च्या अधिकृत बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा पवित्र इतिहास, प्राचीन धार्मिक परंपरा आणि आध्यात्मिक ऊर्जेचा दैदिप्यमान आविष्कार या बोधचिन्हाच्या माध्यमातून जगासमोर आला आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या सोहळ्यात विविध आखाड्यांचे पूज्य साधू-संत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या बोधचिन्हाचे अनावरण करून आगामी सिंहस्थाच्या तयारीचा श्रीगणेशा करण्यात आला.या अद्वितीय बोधचिन्हाची निवड एका देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून करण्यात आली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, 'मायगव्ह' आणि 'असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३ हजार ६७ कलाकारांनी आपल्या प्रवेशिका सादर केल्या होत्या. विशेष म्हणजे, आपली संस्कृती आणि वारशाबद्दल जागरूक असलेल्या १८ ते २४ वयोगटातील तरुण पिढीने या स्पर्धेत सर्वाधिक सहभाग नोंदवून हिंदुत्वाच्या अस्मितेशी आपले नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले. सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी राहिले असून, त्यापाठोपाठ दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक होता.





हे बोधचिन्ह म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेचे सार आहे. यामध्ये भगवान शंकराचे त्रिशूळ हे आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक म्हणून स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती प्रादेशिक वारशाचे दर्शन घडवते, तर काळाराम मंदिराची कमान नाशिकच्या ऐतिहासिक भक्तीचा संदर्भ देते. विशेष म्हणजे, जीवनदायिनी गोदावरी नदीला 'शिवलिंगा'च्या रूपात दर्शविण्यात आले असून, कुंभमेळ्यातील पवित्र शाही स्नानाचे धार्मिक महत्त्व यातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.या सोहळ्याला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, छगन भुजबळ, दादाजी भुसे, उदय सामंत, शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आगामी कुंभमेळा हा पर्यावरणपूरक, शिस्तबद्ध आणि हिंदू धर्माच्या वैभवाला साजेसा होईल, असा संकल्प यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साधू-संतांच्या साक्षीने व्यक्त केला


Comments
Add Comment

Mantralay : मंत्री कार्यालयातील ‘उसनवारी’ आणि ‘मौखिक’ नेमणुका रद्द, १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात परतावे लागणार; मुख्य सचिवांचे आदेश

मुंबई : विहित नियम आणि कायदेशीर प्रक्रिया डावलून मंत्रालयीन विभागांत तसेच मंत्र्यांच्या कार्यालयांत बाह्य

Basic Marathi : रिक्षा-टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आणखी कालावधी मिळणार

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६

Cab vs Auto : बोरीवली स्टेशनबाहेर कॅबचालकाला धमकी? व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

Mumbai : एका व्हायरल व्हिडिओमध्ये, मुंबईतील बोरीवली स्टेशन ईस्टच्या प्रवेशद्वारावर एक ऑटोचालक एका कॅबचालकाला

Viral Video : आता काय बोलायचं ? चक्क फ्लायओव्हरच्या उंच खांबावर कुटुंबाने थाटला संसार; व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

उंचच उंच फ्लायओव्हरच्या काँक्रीट खांबावर एका कुटुंबाने आपला संसार थाटल्याचा एक १५ सेकंदांचा व्हिडिओ सध्या