Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ल्यावर आता 'हायटेक' जेट्टी

मुरुड-जंजिरा : जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असलेल्या ऐतिहासिक जंजिरा जलदुर्ग किल्ल्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची अनेक वर्षांची गैरसोय आता दूर झाली आहे. किल्ल्याजवळ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक जेट्टी आणि लाटरोधक भिंतीचे लोकार्पण मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बुधवारी दिमाखात पार पडले. या प्रकल्पामुळे पर्यटकांचा प्रवास सुखकर होण्यासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी गती मिळणार आहे.





राजपुरी, दिघी आणि मुरुडखोरा येथून जंजिऱ्याकडे जाण्यासाठी पर्यटकांना शिडांच्या होड्यांचा आधार घ्यावा लागतो. मात्र, किल्ल्याजवळ जेट्टी नसल्याने चढ-उतार करताना पर्यटकांची मोठी कसरत होत असे. महाराष्ट्र सागरी मंडळाने (एमएमबी) लाटरोधक भिंत आणि सुसज्ज जेट्टी उभारल्याने आता भरती-ओहोटीच्या काळातही सुरक्षित प्रवास शक्य होणार आहे. दरम्यान "हा प्रकल्प केवळ पर्यटनासाठी नसून, याद्वारे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील," असा विश्वास नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे, मुरुडच्या नगराध्यक्ष आराधना दांडेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




भरडखोल मत्स्यबंदराचे भूमीपूजन : जंजिऱ्याच्या लोकार्पणानंतर श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथे मासेमारी बंदराच्या विकासकामांचा भूमीपूजन सोहळा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मच्छिमारांना आधुनिक सोयी-सुविधा पुरवण्यासाठी शासन कटिबद्ध असून, नियोजित वेळेत हे बंदर विकसित केले जाईल, अशी ग्वाही राणे यांनी दिली.

मत्स्यव्यवसायासाठी १ हजार २४० कोटींचा निधी : मच्छिमारांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत्स्यव्यवसाय विभागाला वार्षिक १ हजार २४० कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. "मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्याने आता या क्षेत्राला मोठे बळ मिळाले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा' सारख्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त मच्छिमारांनी घ्यावा," असे आवाहन राणे यांनी केले. राज्याच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
Comments
Add Comment

Amit Shah : ' तुमचे हे पाप देशातील जनता कधीच माफ करणार नाही'

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात (इंदिरा भवन) स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान

Kiren Rijiju : "विरोधी नेत्यांना 'दिमागी नक्षलवादी' म्हटले नाही"

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातील 'दिमागी नक्षलवादी'

Nashik Firing : नाशिकमध्ये पानटपरीवर उभ्या असलेल्या तरुणावर गोळीबार

नाशिक : अध्यात्मिक शहर अशी ओळख मिरवणाऱ्या नाशिकमध्ये रविवारी गोळीबाराची घटना घडली. नाशिक रोडच्या गोसावी

Sunetra Pawar : 'दादांचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न सर्वांच्या साथीने पूर्ण करायचे आहे'

पुणे : दादांनी (अजित पवार) तुम्हाला आणि मला दिलेला हा जो विकासाचा वारसा आहे तो वारसा अर्ध्यावर सोडून देणे हे

Meghna Sakore Bordikar : 'परभणी गुंतवणूक परिषदेतून १,६०० कोटींची गुंतवणूक; स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी'

परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात परभणी जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना