Wednesday, August 26, 2026

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

Footpath Encroachment : पदपथ अतिक्रमण मुक्तीच्या निर्देशानंतर, याच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त थेट उतरल्या रस्त्यावर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील (Mumbai) पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी 'पेडेस्ट्रियन फर्स्ट' (Pedestrian First) अभियान l प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी नुकतेच दिले आहेत. मात्र हे निर्देश देऊन ते थांबले नसून प्रत्येक विभागात याची कशाप्रकारे अंमलबजावणी होते यासाठी त्या स्वतः रस्त्यावर उतरून पाहणी करत परिमंडळ उपायुक्त आणि संबंधित विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडून आढावा घेत आहेत. तसेच त्यांच्या समस्याही जाणून घेत आहेत.

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पश्चिम उपनगरातील ‘के पश्चिम’ आणि ‘पी दक्षिण’ विभागात गुरुवारी सकाळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. विले पार्ले परिसरातील स्वामी विवेकानंद मार्गावरून राम गणेश गडकरी मार्गाद्वारे कूपर रुग्णालयाकडे मोठ्या प्रमाणात रुग्णांची व रुग्णवाहिकांची ये-जा असते. तसेच, या मार्गावरून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचीही मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे, या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. (Footpath Clearance)

'पेडेस्ट्रियन फर्स्ट' (Pedestrian First) अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात ३२० किलोमीटर लांबीच्या पदपथांवरील अतिक्रमण संपूर्णतः हटवून नागरिकांना सुलभ चालता यावे, यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या अनुषंगाने, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी विले पार्ले (पश्चिम) परिसरात राम गणेश गडकरी मार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्गे (एस. व्ही. रोड) परिसरात पदपंथांची आज प्रत्यक्ष पाहणी केली.

या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात ‘के पश्चिम’ विभागातील एकूण ३५५ मार्गांपैकी २७ मार्ग हाती घेण्यात आले आहेत. या २७ मार्गांवरील ३७.७ किलोमीटर इतके अंतर अतिक्रमणमुक्त करण्यात येत आहेत. पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले, अतिक्रमणे व इतर सर्व प्रकारचे अडथळे तत्काळ हटवून पदपथ पूर्णपणे अडथळामुक्त करावेत. तसेच, पदपथांची सुधारणा, सुशोभीकरण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले.यावेळी सह आयुक्त (परिमंडळ- ४) डॉ. भाग्यश्री कापसे, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, सहायक आयुक्त कुंदन वळवी आदी उपस्थित होते. (Maharashtra News)

Comments

SanjayGhatkar    August 6, 2026 10:13 AM

आयुक्तांच्या या उपक्रमाबद्दल खूप आभार! परंतु त्यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी होतेय का हे देखील खात्री करून घेणे गरजेचे आहे. आयुक्तांनी मालाड स्टेशन पूर्वेकडून येऊन राणी सती मार्ग पूर्ण व्हिडिओ मागवून घ्यावा आणि हे बघावे की एखादा ज्येष्ठ नागरिक जर या मार्गाने चालत जाण्याचा विचार करत असेल तर त्याला फूटपाथ शिल्लक आहे की नाही. फार वाईट अवस्था आहे. आपण राणी सती मार्गाने ओंकार अल्टामॉन्ट/राम निवास पर्यंत येऊन बघावे. कोणीही सांगू शकते की फूटपाथ नावाची गोष्ट शिल्लकच नाही.

Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >