MNS Corporator : निधी नका देऊ, माझा प्रभाग दत्तक घ्या; मनसे नगरसेविकेने महापौरांकडे लेखी पत्राद्वारे केली विनंती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात महापालिकेच्या स्तरावर महापौरांच्या माध्यमातून २५० कोटी रुपयांची सुधारणा करण्यात आल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनाच निधी दिल्यामुळे इतर नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.त्यामुळे मनसेच्या नगरसेविकेने चक्क महापौरांना पत्र लिहून माझा प्रभाग आपण दत्तक घ्या. या प्रभागातील सर्व कामे आपणच करा आणि या प्रभागातील कामांचेही श्रेय आपणच घ्या. मला माझ्या प्रभागातील कामांचे श्रेय नको, पण किमान मला निवडून देणाऱ्या नागरिकांची सेवा सुविधांची कामे करून त्यांना दिलासा द्या,अशीच सूचना केली.



मनसेच्या प्रभाग क्रमांक ३८च्या नगरसेविका सुरेखा परब लोके यांनी महापौरांनी पत्र लिहून माझा प्रभाग दत्तक घेण्याची विनंती केली आहे. या पत्रामध्ये सुरेखा लोके यांनी असे नमुद केले आहे की, मुंबई महापालिकेने वर्ष २०२६-२७ साठी काही लाखांच्या विकासनिधीची तरतूद केली आहे. तर दुसरीकडे, मुंबईतील अनेक वॉर्डांवर वर्ष २०२६-२७ साठी कोट्यवधींच्या विकासनिधीची खैरात करण्यात आली आहे. पण आपला प्रभाग ३८ हा झोपडपट्टीबहुल असून नागरिकांनी अपेक्षित असलेला विकास घडवण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. मात्र आमच्या वॉर्डासाठी अत्यल्प विकासनिधीची तरतूद झाल्यानंतर स्थानिकांच्या आशा-अपेक्षांची आणि गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेल्या विकासस्वप्नांची पूर्तता करायची तरी कशी, हा प्रश्न मला सतावत आहे.



मुंबईतल्या इतर वॉर्डातील नागरिक आणि आमच्या वॉर्डातील नागरिक हे मुंबईकरच आहेत. सर्व मुंबईकरांना समान वागणूक मिळणे अपेक्षित असतानाही विकासनिधीच्या माध्यमातून आमच्या वॉर्डातील नागरिकांना भेदभावपूर्ण वागणूक देणे निश्चितच भूषणावह नाही. नगरसेवक म्हणून निवडून देणाऱ्या मतदार- नागरिकांना दिली जाणारी ही दुय्यम वागणूक म्हणजे त्यांचा घोर अपमान आहे.



वॉर्डात गटारदुरुस्तीपासून शौचालयांच्या स्वच्छतेपर्यंतच्या अनेक मूलभूत- महत्वाच्या कामांसाठी अनेक चाळींनी माझ्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी केलेली आहे. दुर्दैवाने, २०२६-२७ वर्षात स्थानिकांना अपेक्षित असलेली कामे महापालिकेने तरतूद केलेल्या तुटपूंज्या निधीतून पूर्ण करणे मला शक्यच होणार नाही. म्हणूनच वाॅर्ड क्र. ३८ आपण स्वत: दत्तक घ्यावा! अशी विनंती त्यांनी महापौरांना केली. या पत्रासोबत वॉर्डातील अत्यावश्यक- मूलभूत विकासकामांची यादीही त्यांनी सोबत जोडली आहे. त्यानुसार आपण मुंबईच्या महापौर म्हणून वॉर्ड क्र. ३८ मधील प्रलंबित विकासकामे पूर्ण करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा. प्रश्न विकासकामांचे श्रेय घेण्याचाच आहे ना? आपण संपूर्ण श्रेय घ्या! पण आमच्या वॉर्डातील नागरिकांच्या भावनांशी खेळू नका,असेही नमुद केले.

Comments
Add Comment

Oshiwara Maternity Hospital : ओशिवरा प्रसूतीगृहाचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण

जोगेश्वरी परिसरातील गर्भवती माता व नवजात बालकांना दर्जेदार आरोग्य सेवांची मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई

Mumbai Mayor Bungalow : महापौर बंगल्यासह परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामांची निविदा रद्द

महापौरांच्या निर्देशानानंतर प्रशासनाची कार्यवाही विरोधकांसह शिवसेनेनेही व्यक्त केली या खर्चावर

Property Tax Rules : ग्रंथालयांना आकारला जातो व्यावसायिक दराने कर

निवासी दर कर आकारण्याची महापालिकेकडे नगरसेवकाची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील ग्रंथालयांंना सध्या

BMC : महापालिका सभागृहासह समित्यांचे कामकाज पेपरलेस

सर्व नगरसेवकांना येत्या महिन्याभरात मिळणार टॅब मुंबई (सचिन धानजी) : मुंबइ महापालिकेतील कारभार पेपरलेस

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम