Amol Mitkari : १४ मेपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात!

अमोल मिटकरींनी आमदारकीच्या शेवटच्या दिवशी सुनेत्रा पवारांची घेतली भेट


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचा आमदारकीचा कार्यकाळ बुधवार, १३ मे रोजी संपुष्टात आला आहे. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत, '१४ मेपासून एका नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करणार' असल्याचे म्हटले आहे. आमदारकीच्या शेवटच्या दिवशी त्यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.


आपल्या भावना व्यक्त करताना मिटकरी म्हणाले की, "आजचा दिवस हा संघर्ष, वादळे आणि अनेक शिकवणींनी भरलेल्या एका मोठ्या राजकीय टप्प्याचा समारोप आहे. गेल्या सहा वर्षांत अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. टीका झाली, संघर्ष करावा लागला आणि अनेकदा एकटेपणाही वाट्याला आला; मात्र महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास हेच माझे बळ ठरले."



आपल्या राजकीय प्रवासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या संधीचा उल्लेख करताना मिटकरी भावूक झाले. "दादांनी दिलेल्या संधीमुळेच मला राज्याच्या प्रश्नांवर काम करण्याची ताकद मिळाली. आज दादा आपल्यात नाहीत, हे कटू वास्तव पचवणे कठीण आहे. त्यांची अनुपस्थिती ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी पोकळी आहे," अशा शब्दांत त्यांनी अजित पवारांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.


नव्या इनिंगबाबत सूतोवाच

दुसरीकडे, आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल मिटकरी यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पक्षाने झिशान सिद्दीकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मिटकरी यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, "माझा संघर्ष अजून संपलेला नाही. उद्यापासून सुरू होणारा प्रवास अधिक संयमी, प्रगल्भ आणि महाराष्ट्राच्या मातीशी घट्ट नाते सांगणारा असेल," असे म्हणत मिटकरी यांनी नव्या इनिंगचे सूतोवाच केले आहे.

Comments
Add Comment

Pune MHADA Lottery 2026 : पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी; म्हाडाकडून ४,४६२ घरांसाठी सोडत जाहीर

पुणे : पुणे आणि आसपासच्या परिसरात स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाने एक अत्यंत

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून, ८९.६० लाखांची मदत

मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.