Pune MHADA Lottery 2026 : पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी; म्हाडाकडून ४,४६२ घरांसाठी सोडत जाहीर

पुणे : पुणे आणि आसपासच्या परिसरात स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाने एक अत्यंत दिलासादायक बातमी आणली आहे. म्हाडाने तब्बल ४ हजार ४६२ परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी अधिकृत लॉटरी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, खाजगी बिल्डर्सच्या प्रकल्पातील २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत म्हाडाद्वारे स्वस्त घरे मिळवण्याची ही शेवटचीच संधी असणार आहे, कारण ही योजना यापुढे महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार आहे. या घरांसाठी आज दुपारी १२ वाजल्यापासून नोंदणी, अर्जविक्री-अर्जस्वीकृती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. दरम्यान, खासगी विकासकांच्या प्रकल्पातील घरे म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या दरात खरेदी करण्याची ही शेवटची संधी इच्छुकांना असणार आहे. आता २० टक्के योजना म्हाडाकडून काढून घेण्यात आली आहे. हा निर्णय लागू होण्यापूर्वी पुणे मंडळाला उपलब्ध झालेल्या २० टक्के योजनेतील घरांचा या सोडतीत समावेश आहे. यानंतर २० टक्क्यांतील घरांचे वितरण पालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे.



घरांचे वर्गीकरण आणि महत्वाच्या तारखा



या सोडतीमध्ये २,९७१ घरे ही २०% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत, तर १,४९१ घरे १५% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत.


ऑनलाइन अर्जप्रक्रिया आणि नोंदणीचे वेळापत्रक  


अर्ज व नोंदणी सुरुवात : २४ ऑगस्टपासून (दुपारी १२ वाजेपासून)


माहिती पत्रक व अर्ज प्रक्रिया: म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध


ऑनलाइन अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम मुदत: १५ सप्टेंबर (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)


RTGS / NEFT द्वारे शुल्क भरण्याची मुदत: १६ सप्टेंबर


अर्जांची प्रारूप यादी: २९ सप्टेंबर (सायंकाळी ७ वाजता)


अंतिम पात्र यादी: ८ ऑक्टोबर (सायंकाळी ७ वाजता)


लॉटरीची सोडत (निकाल) : १३ ऑक्टोबर (सकाळी ११ वाजता)


इच्छुक नागरिकांनी घरांच्या किमती, जागा आणि इतर सर्व माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत पोर्टलवर भेट देऊन अनामत रक्कमेसह आपला अर्ज मुदतीत दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून, ८९.६० लाखांची मदत

मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून