Rahul Narvekar : राज्यातील आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद


मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधिमंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचे आणि काटकसरीचे जे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १२ आमदारांचा नियोजित जपान दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला संबोधित करताना सांगितले होते की, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नसल्याने आपण आयातीवर अवलंबून आहोत. जागतिक संकटामुळे इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने पेट्रोल, डिझेल, गॅस आणि स्वयंपाकाच्या तेलाचा वापर जपून करावा. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांनी सरकारी खर्चात कपात आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी हा परदेश दौरा स्थगित केला आहे.


जपानमधील दोन राज्यांच्या राज्यपालांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या आमदारांना त्यांच्या राज्यांना भेट देण्याचे अधिकृत निमंत्रण दिले होते. या निमंत्रणानुसार, अभ्यासासाठी १२ आमदारांचे एक शिष्टमंडळ लवकरच जपानला रवाना होणार होते. या दौऱ्याची सर्व तयारी पूर्ण झाली होती, मात्र बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे आणि राष्ट्रीय हिताचा विचार करून हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील

Police raid : कर्जत ‘ड्रग्ज’च्या विळख्यात? पोलिसांच्या छाप्याने खळबळ; नायजेरियन नागरिक ताब्यात

रायगड : कर्जत तालुक्यातील हलीवली परिसरातील सिग्नेचर डिझायर इमारतीत अंमली पदार्थांची विक्री होत असल्याच्या

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटी अनिर्णित; भारताने कसोटी मालिका १-० ने जिंकली

कोलंबो : श्रीलंका दौऱ्यावर, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये सहज विजय मिळवून

ICC bans UAE batter : आयसीसीची युएईचा फलंदाज आसिफ खानवर १५ महिन्यांची बंदी

दुबई : संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) अनुभवी फलंदाज आसिफ खान याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) डोपिंग