विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निर्णय; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद
मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधिमंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला इंधन बचतीचे आणि काटकसरीचे जे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १२ आमदारांचा नियोजित जपान दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे.
कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राईम विभागाला पत्र मुंबई : राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला संबोधित करताना सांगितले होते की, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नसल्याने आपण आयातीवर अवलंबून आहोत. जागतिक संकटामुळे इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने पेट्रोल, डिझेल, गॅस आणि स्वयंपाकाच्या तेलाचा वापर जपून करावा. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांनी सरकारी खर्चात कपात आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी हा परदेश दौरा स्थगित केला आहे.






