NEET-UG 2026 : पेपरफुटीमुळे NEET परीक्षा रद्द झाली, आता पुढे काय होणार ?

नवी दिल्ली : पेपरफुटी झाल्याचे उघड झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी रविवार ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली 'नीट' (NEET-UG 2026 or National Eligibility cum Entrance Test For Undergraduate) परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA or National Testing Agency) हा निर्णय घेतला आहे. आता पुढे काय होणार या प्रश्नाचे उत्तर एनटीएने दिले आहे.






पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी मे २०२६ च्या परीक्षेसाठी आधीच नोंदणी केली होती त्यांना पुन्हा होणार असलेल्या 'नीट' (NEET-UG 2026 or National Eligibility cum Entrance Test For Undergraduate) परीक्षेसाठी नव्याने नोंदणी करावी लागणार नाही. विद्यार्थ्यांना ३ मे रोजी ज्या परीक्षा केंद्रात परीक्षेसाठी बोलावले होते त्याच परीक्षा केंद्रात पुन्हा परीक्षेसाठी बोलावले जाणार आहे. परीक्षा केंद्रांच्या नियोजनात बदल केला जाणार नाही. नव्याने होणार असलेल्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नव्याने शुल्क आकारले जाणार नाही. विद्यार्थ्यांनी ३ मे रोजी झालेल्या परीक्षेसाठी भरलेले पैसे त्यांना परत केले जातील आणि NTA स्वतःच्या अंतर्गत निधीतून फेरपरीक्षा घेणार आहे.



नीटची फेरपरीक्षा कधी होणार याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. फेरपरीक्षेचे वेळापत्रक आणि नवीन प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करण्याबाबतची माहिती लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA or National Testing Agency) दिली आहे. परीक्षेच्या नव्या वेळापत्रकाची माहिती घेण्यासाठी एनटीएच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.


नीट संदर्भात काही शंका असल्यास अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA or National Testing Agency) केले आहे.


हेल्पलाईन :


ई-मेल : neet-ug@nta.ac.in


संपर्क क्रमांक : 011-40759000 / 011-69227700

Comments
Add Comment

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी

National Teacher Award 2026 : उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

नवी दिल्ली : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23