IPL Ticket Black Market : आयपीएल तिकिटांच्या काळ्याबाजाराचे रॅकेट उद्ध्वस्त

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ५१ साखळी सामने खेळून झाले आहेत. सध्या गुणतालिकेत सनरायझर्स हैदराबा पहिल्या, पंजाब किंग्स दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तिसऱ्या, राजस्खान रॉयल्स चौथ्या, गुजरात टायटन्स पाचव्या, चेन्नई सुपरकिंग्स सहाव्या, कोलकाता नाईट रायडर्स सातव्या, दिल्ली कॅपिटल्स आठव्या, मुंबई इंडियन्स नवव्या आणि लखनऊ सुपर जायंट्स दहाव्या स्थानावर आहे. आयपीएलचे आणखी १९ साखळी सामने व्हायचे आहेत. यानंतर प्ले ऑफ राउंड सुरू होणार आहे. याआधीच आयपीएल तिकिटांच्या काळ्याबाजाराचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत.



दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अँटी रॉबरी अँड स्नॅचिंग सेल अर्थात एआरएससीने आयपीएल तिकिटांच्या काळ्याबाजाराचे रॅकेट उद्ध्वस्त केले. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांकडून ५४ सामन्यांच्या तिकिटांशी संबंधित माहिती तसेच ३३ मोफत पास (कॉम्प्लिमेंटरी पास) आणि २५ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. आणखी काही जणांची धरपकड होण्याची शक्यता आहे.



आयपीएल सामन्यांच्या प्रीमियम तिकिटांची आणि मोफत पासची चढ्या दराने बेकायदेशीर विक्री सुरू होती. ही टोळी देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये बुकी आणि गुंडांच्या मदतीने उलाढाल करत होती. विक्रीसाठी उपलब्ध नसलेले मोफत पास बेधडक चढ्या दराने विकले जात होते. हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.



याआधी आयपीएलचा अंतिम सामना बंगळुरू येथून अहमदाबाद येथे स्थलांतरित केल्याचे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी गुरुवारी जाहीर केले. मोफत तिकिटांच्या मागणीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली. यानंतर सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय झाल्याचे सैकिया म्हणाले. गतविजेत्या संघाच्या व्यवस्थापनाला त्यांच्या शहरात आयपीएल प्लेऑफमधील एका सामन्याचे तसेच अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी विनंती करण्याचा विशेषाधिकार आहे. या अधिकाराचा वापर करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या व्यवस्थापनाने बंगळुरूत अंतिम सामन्याचे आयोजन करण्यासाठी नियोजन सुरू केले होते. बीसीसीआयने अंतिम सामना बंगळुरूत खेळवण्याची तयारी सुरू केली होती. पण अचानक मोफत तिकिटांच्या मागणीत अव्वाच्या सव्वा वाढ झाली. कर्नाटक सरकारसाठीच ७०० मोफत पाससह एकूण दहा हजार अतिरिक्त तिकिटांची मागणी झाली. यानंतर सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतल्याचे सैकिया यांनी सांगितले.



आता क्वालिफायर वन २६ मे रोजी हिमाचल प्रदेशमधील धरमशालात तर एलिमिनेटर आणि क्वालिफायर टू हे दोन सामने अनुक्रमे २७ आणि २९ मे रोजी राजस्थानमध्ये न्यू चंदिगडच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये, होणार आहेत. अंतिम सामना ३१ मे रोजी गुजरातमध्ये अहमदाबाद येथील मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.

Comments
Add Comment

Nashik Crime News : ...'तर पहिला खून तुमचा होईल,' नाशिकमध्ये व्यापाऱ्यांना बिश्नोई गँगच्या नावाने धमकी

Nashik Crime News : नाशिकच्या महात्मा गांधी रोडवरील क्रीडा साहित्य आणि वाद्य विक्री करणाऱ्या दोन व्यापारी बंधूंना तब्बल २

Rajasthan School Audit Report : राजस्थानमधील ६११ सरकारी शाळांना स्वतःची इमारतच नाही; विधानसभेत ऑडिट रिपोर्ट सादर

राजस्थानमधील सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांची अत्यंत दयनीय अवस्था विधानसभेत सादर करण्यात आलेल्या एका

Nashik Crime News : मोबाइलचे नेटवर्क गेले अन् खाते रिकामे झाले, नाशिकच्या कंत्राटदाराचे ५०.४७ लाख गायब

Nashik Crime News : नाशिकमधील एका कंत्राटदाराच्या मोबाइलचे नेटवर्क अचानक बंद पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांत त्यांच्या बँक

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Nashik : वीजचोरीविरोधात महावितरणची धडक कारवाई, जिल्ह्यात एकाच दिवशी १४ जणांवर गुन्हे दाखल

Nashik : वीजचोरी करून व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात महावितरणच्या (Mahavitran) नाशिक भरारी पथकाने धडक कारवाई केली असून,