Nashik Heatwave : उन्हाचा तडाखा वाढला… जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकसाठी ‘यलो अलर्ट’

Nashik Heatwave : राज्यात एप्रिलच्या अखेरीपासून वाढू लागलेला उन्हाचा तडाखा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी तीव्र झाला असून, अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेने कहर केला आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून, हवामान विभागाने मंगळवारी काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) जारी केला आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्येही उष्ण लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. Nashik city's temperature hits 42 degrees Celsius'



नाशिक शहराचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर


गेल्या दोन दिवसांपासून नाशिककरांना (Nashik) उन्हाचा चांगलाच चटका बसत असून, सोमवारी (दि.११) शहराचा पारा थेट ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचला. या मोसमातील हे आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान (Temperature) ठरले आहे. रात्रीचे किमान तापमानही २६ अंशांवर असल्याने नाशिककर दिवस-रात्र उकाड्याने हैराण झाल्याचं पाहायला मिळतंय. (Nashik city's temperature hits 42 degrees Celsius)



ग्लोबल वॉर्मिंगचा नाशिकलाही फटका


नाशिकच्या हवामान इतिहासात (Climate History) २०११ पर्यंत तापमानाने कधीही ४२ अंशांचा टप्पा ओलांडला नव्हता. मात्र, गेल्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंगचा (Global warming) फटका नाशिकलाही बसत आहे. २८ एप्रिल २०१९ रोजी ४२.८ अंश अशी सर्वोच्च नोंद झाली होती. सोमवारची ४२ अंशांची नोंद ही गेल्या काही वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च पातळी ठरली आहे. उन्हाच्या (Summer) तीव्रतेमुळे दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत शहरातील मुख्य बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने (Mumbai Regional Meteorological Centre)नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) १३ मे पर्यंत येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.



शिवडीत ४६ अंश नोंद


निफाड तालुक्यातील शिंवडी येथे तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोहोचल्याने नागरिकांसह शेतीला मोठा फटका बसला आहे. वाढत्या उष्णतेमुळे पालेभाज्या जळून खाक होत असून, शेतीची कामेही ठप्प झाली आहेत. कसबे सुकेणे परिसरातही पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, हिंदी महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात झालेली वाढआणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडील ६० ते ६५ पूर्व रेखांशावर निर्माण झालेले हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या वाटचालीस पूरक ठरत आहे.

Comments
Add Comment

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने