Anna Bansode : चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढा..

एका महिन्यात अंमलबजावणी अहवाल सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश...


मुंबई: मुंबईतील गोरेगाव येथील चित्रनगरीसह राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनिअर कलाकारांच्या विविध प्रश्नांबाबत आज विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.कंत्राटी कामगार व ज्युनिअर कलाकारांच्या कामाचे तास निश्चित करावेत,सकस भोजनाची व्यवस्था, वेतन थेट निर्मात्यांकडून देणे, चित्रीकरण स्थळी स्वच्छता राखणे, महिला कलाकारांसाठी स्वतंत्र कपडे बदलण्याची सुविधा तसेच रात्रीच्या चित्रीकरणानंतर सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यात आली.


गेल्या हिवाळी अधिवेशन २०२५ दरम्यान औचित्याच्या मुद्द्याद्वारे चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार व ज्युनिअर कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर प्रशासनाने कार्यवाही न केल्याने आमदार सुनील प्रभू यांनी नाराजी व्यक्त केली.



शासनाच्या मानक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत चित्रनगरी प्रशासनाने संबंधित निर्मिती संस्थांना यापूर्वी सूचना देऊनही अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याबाबत यावेळी चिंता व्यक्त करण्यात आली.कंत्राटी फिल्म कामगार आणि ज्युनियर कलाकारांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संयुक्त समितीची बैठक घेण्याच्या सूचना यावेळी उपाध्यक्षांनी दिल्या. तसेच, करण्यात आलेल्या उपाययोजनांचा सविस्तर अंमलबजावणी अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत.राज्यातील सुमारे ५ लाख कंत्राटी फिल्म कामगार व ज्युनिअर कलाकारांच्या हितासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करून ठोस उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.



या बैठकीत आमदार सुनील प्रभू,फिल्म सिटी च्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, फिल्मसिटी चे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे उप सचिव महेश वाव्हळ तसेच विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Comments
Add Comment

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून, ८९.६० लाखांची मदत

मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.

Mumbai News : मुंबईत 11व्या मजल्यावरून पडून AC तंत्रज्ञाचा मृत्यू; पर्यवेक्षक आणि कंत्राटदार ताब्यात

मुंबई: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील (BKC) टेन बीकेसी कॉम्प्लेक्समध्ये एसी युनिट बसवताना 11व्या मजल्यावरून