Minister Chhagan Bhujbal : राज्यात इंधनाचा तुटवडा नाही, पण काटकसर गरजेची! - मंत्री छगन भुजबळ

मुंबई : "महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल किंवा स्वयंपाकाच्या गॅसचा कोणताही तुटवडा नाही. गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने शिल्लक गॅस वाटपाचे अधिकार राज्याला दिल्याने पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे", अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी मंगळवारी दिली.


इराण आणि अमेरिका (Iran and America) यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक इंधन संकटामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, इतर देशांच्या तुलनेत भारत देश मजबुतीने उभा असला, तरी इंधन आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत एकदम पहिल्यासारखी परिस्थिती होणे सध्या कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले. जागतिक बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. पाकिस्तान, बांगलादेशापासून अगदी जपानसारख्या विकसित देशांनाही या संकटाचा मोठा फटका बसला आहे. मात्र, केंद्र सरकारने आयातीचे धोरण लवचिक ठेवले आहे. पूर्वी आपण २७ देशांकडून इंधन आयात करत होतो, आता ती संख्या ४५ ते ५० देशांवर नेली आहे. यामुळेच जागतिक संकटातही भारताचा टिकाव लागला आहे. युद्धाच्या अनिश्चिततेमुळे जगात संभ्रमावस्था असून सर्वच देशांना स्वतःहून सावरणे गरजेचे असल्याचेही भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी नमूद केले.




पर्यायी इंधनावर भर

वाढत्या किमती आणि संभाव्य टंचाई लक्षात घेता, गरज पडल्यास केरोसिन (रॉकेल) वितरणाचा पर्याय सरकारच्या विचाराधीन आहे. सध्या रॉकेलचा दर ६१ रुपये प्रति लीटर असून, एलपीजीला पर्याय म्हणून कोळसा आणि रॉकेलचा वापर करता येऊ शकतो. या संदर्भात जिल्ह्यातील साठवणूक आणि वितरण व्यवस्थेची माहिती सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आली आहे," असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

National Teacher Award 2026 : महाराष्ट्रातील ४ शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुंबई : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation)

CM Devendra Fadnavis : नवी मुंबई पोलिसांचे अत्याधुनिक ‘प्रहारी’ सीसीटीव्ही कमांड सेंटर कार्यान्वित; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन

ठाणे : नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज

CM Devendra Fadnavis : नवी मुंबईत 'कॅम्पस कनेक्ट' मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर राहून राष्ट्रभक्तीकडे वळण्याचे आवाहन

ठाणे : व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्यविकास आणि राष्ट्रउभारणीकडे वळावे, असे आवाहन

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने